रागावलेल्या पत्नीला असे करा शांत; वापरा ‘या’ सोप्या टिप्स

आपली पत्नी देखील आपल्यावर रागावली आहे तर त्यांचा राग कमी करण्यासाठी आपण त्यांना काही..

    नवरा बायकोच्या नात्यात बऱ्याच वेळा लहान-लहान गोष्टींवरून भांडणे होतात. हे भांडण विकोपाला जाऊन पोहोचतात, आणि पती-पत्नीच्या नात्यात दुरावा येतो. बऱ्याच वेळा असं होत की पत्नी काही कारणावरून रागावून जाते आणि दोघात अबोला होतो. आपण पत्नीचा राग घालविण्यासाठी या टिप्स अवलंबवा. जेणे करून पत्नीचा राग नाहीसा होईल. चला तर मग जाणून घेऊ या.

    1 भेटवस्तू देऊन-आपली पत्नी देखील आपल्यावर रागावली आहे तर त्यांचा राग कमी करण्यासाठी आपण त्यांना काही भेट वस्तू देऊ शकता.ही भेट वस्तू त्यांचा आवडीची असू शकते किंवा एखादी अशी वस्तू ज्याची त्यांना गरज आहे.ती देखील आपण त्यांना देऊ शकता.असं केल्याने त्यांचा राग शांत होईल आणि आपल्यातील प्रेम पुन्हा बहरेल.

    2 कॅंडल लाईट डिनर –आपणास पत्नीचा राग घालवायचा असल्यास त्यांच्या साठी कँडल लाईट डिनरची व्यवस्था करू शकता.आपण त्यांना कँडल लाईट डिनर दिल्यावर त्यांना छान वाटेल आणि त्यांचा राग शांत होईल.

    3 शॉपिंग करवून – स्त्रियांना शॉपिंग करणे खूप आवडते.प्रत्येक स्त्रीला शॉपिंग करणे आवडते.आपण पत्नीचा राग शांत करण्यासाठी त्यांना शॉपिंगला नेऊ शकता. आपले पैसे खर्च तर होणार परंतु पत्नीचा राग शांत होईल.

    4 घरकामात त्यांची मदत करून –आपण घर कामात मदत करून देखील पत्नीचा राग घालवू शकता.असं केल्याने त्यांना चांगले वाटेल आणि आपण त्यांची किती काळजी घेता असं त्यांना वाटेल.आणि त्यांचा राग शांत होईल.आणि आपल्यातील प्रेम बहरून निघेल.