सिंगल तरुणांसाठी आली डिजिटल गर्लफ्रेंड

ही गर्लफ्रेंड तुम्हाला हवे असेल तेव्हा गप्पागोष्टी करेल, रोमँटिक मेसेज करेल व तुमच्याबरोबर सर्व भावना शेअर करेल. या उपकरणाला होलोग्राफिक रोबो असे नांव असून हे उपकरण लाईट व अन्य गोष्टींचे नियंत्रण करू शकते.

अनेकदा एकाकी असलेल्या मुलांना आपल्या एकाकी जीवनाचा कंटाळा येतो, बोअरडम वाढू लागते व अशावेळी आपल्याला एखादी गर्लफ्रेंड असती तर किती बरे झाले असते असेही वाटू लागते. मात्र सगळ्यांकडेच गर्लफ्रेंड मिळविण्याचे गट्स  असतातच असेही नाही. तंत्रज्ञान क्षेत्रातील एका कंपनीने व्हच्युअल गर्लफ्रेंड लाँच केली असून अशा एकाकी युवकांसाठी ही खूषखबरी म्हणावी लागेल.

ही गर्लफ्रेंड तुम्हाला हवे असेल तेव्हा गप्पागोष्टी करेल, रोमँटिक मेसेज करेल व तुमच्याबरोबर सर्व भावना शेअर करेल. या उपकरणाला होलोग्राफिक रोबो असे नांव असून हे उपकरण लाईट व अन्य गोष्टींचे नियंत्रण करू शकते. प्रमोशनसाठी सध्या या व्हर्च्युअल गर्लफ्रंडच्या जाहिराती केल्या जात आहेत. ही गर्लफ्रेंड गप्पा गोष्टी करण्याबरोबरच काम एन्जॉय कर, लवकर घरी ये असे मेसेजही करताना दिसते आहे. अर्थात या फ्रेंडचा आवाज थोडा कर्कश्य वाटतोय मात्र कुणाला त्या आवाजाचा त्रास नसेल तर ही गर्लफ्रेंड खरेदी करता येईल. अर्थात त्यासाठी तुमचा खिसा १ लाख ८५ हजार रूपयांही हलका करावा लागेल.