लग्नाच्या पहिल्या रात्री चुकूनही करू नका या ३ चुका!

या जगामध्ये कोणीही परफेक्ट नाही. त्यामुळे आपल्या पार्टनर मधील कमतरता पहिल्या दिवशी जगाला दाखवून देऊ नका. काहीजणांना वाटते आपण खर आहे तेच बोलतो. पण तुमच्या खरं बोलण्याने जर..

  लग्नाची पहिली रात्र ही प्रत्येकाचं जोडप्यांसाठी खास असते. ती अविस्मरणीय बनावी यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येतात. शरीराच्या मिलनासोबतच मनाचे मिलनही या दिवशी नव्याने होते. परंतु भावनेच्या  ओघात आपण काय बोलतोय याचे भान ठेवायला जर तुम्ही विसरलात तर त्याचा आयुष्यभर पश्चाताप होईल इतके मात्र खरे आहे.

  त्यामुळे जाणून घेऊया लग्नाच्या पहिल्या रात्री कोणत्या चुका प्रकर्षाने टाळायला हव्या.

  १) तुमच्या भविष्यकाळाबद्दल काय सांगावे व काय सांगू नये याचे तारतम्य बाळगा. भूतकाळात आपल्या जीवनामध्ये अनेक व्यक्‍ती येऊन जातात त्या अनेक व्यक्‍तीचा प्रभाव आपल्या जीवनावर पडलेला असतो. त्या व्यक्तीच तुमच्या जीवनामध्ये खास असं स्थान असतं. तुमचा बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड यांच्याबद्दल सांगायचे की नाही हे ठरवून घ्या. शक्‍यतो याबद्दल आपल्या होणाऱ्या जीवनसाथीला अजिबात काही सांगू नका.

  असे म्हणतात की नात्यामध्ये विश्‍वास हा महत्त्वाचा असतो, परंतु जीवनसाथीला विश्‍वासात न घेता तुम्ही ही गोष्ट त्यांना सांगितली तर पहिल्याच दिवशी तुमच्या नात्यांमध्ये तडा जाऊ शकतो. त्यामुळे कोणत्या गोष्टी सांगाव्यात आणि कोणत्या नाही या गोष्टीचं भान असायला हवं. भूतकाळात आपल्या जीवनामधील आलेल्या व्यक्तींबद्दल न सांगितलेलं बरं. लग्नाच्या पहिल्याच दिवशी काय तर संपूर्ण आयुष्यभर ही गोष्ट तुम्ही आपण तुमच्या जोडीदाराला सांगू नका नाहीतर भूतकाळामुळे भविष्यकाळ बिघडल्याशिवाय राहणार नाही.

  २) लग्नाचा हा पहिला दिवस तुमचा आणि तुमच्या पार्टनर चा आहे. या दिवशी फक्त आपण आपल्या बद्दलच बोलायचं.. आपल्या स्वतः बद्दल आणि आपल्या पार्टनरबद्दल. तिच्या सौंदर्याची स्तुती करा किंवा तू कसा हँडसम आहेस रुबाबदार आहेस हे सांगा. एकमेकांविषयी प्रेम व्यक्‍त करा. आपल्या घरातील माणसांबद्दल, कुटुंबातील माणसांबद्दल बोलणं या दिवशी कटाक्षाने टाळा. कारण यामुळे असा समज होऊ शकतो की तुम्हाला तुमच्या जोडीदारा पेक्षा इतर घरातील सदस्य जास्त महत्वाचे आहे. उलट तुम्ही दाखवायला हवे की तुमच्या जीवनामध्ये जी नवीन व्यक्‍ती आलेली आहे त्याबद्दल तुम्हाला जास्त ओढ आहे. जास्त महत्व आहे.

  मित्रांनो शारीरिक गरजा पूर्ण करण्याआधी आपला जोडीदार पूर्णपणे कम्फर्टेबल आहे का ते पहा. अशा गोष्टींमध्ये घाई करू नका. लक्षात ठेवा  शारीरिक गरजे प्रमाणेच मानसिक गरजा ही महत्वाच्या असतात.

  जर तुम्ही पहिल्या दिवशी असे दाखवून दिले की शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी है लग्न केले आहे तर मात्र तुमचा जोडीदार हा मानसिक गरजा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतो. ही गोष्ट अनेकांच्या लक्षात येत नाही आणि काही महिन्यानंतरच किंवा वर्षानंतर घटस्फोट होतो. तुमची पत्नी किंवा पती तुम्हाला सोडून निघून जातात. अनेक विपरीत गोष्टी घडतात याचे कारण असे की मानसिक गरज भागवण्याचा तुम्ही विचारच करत नाही. शारीरिक गरज भागवण्या बरोबरच प्रेम करणेही गरजेचे आहे.

  ३) या जगामध्ये कोणीही परफेक्ट नाही. त्यामुळे आपल्या पार्टनर मधील कमतरता पहिल्या दिवशी जगाला दाखवून देऊ नका. काहीजणांना वाटते आपण खर आहे तेच बोलतो. पण तुमच्या खरं बोलण्याने जर कोणाचे मन दुखावत असेल तर त्यासारखे वाईट काही नाही, आणि या पहिल्या दिवशी जर तुम्ही त्याचे किंवा तिचे मन दुखावले तर समोरची व्यक्‍ती ही गोष्ट आयुष्यभर विसरत नाही. त्या व्यक्‍तीच्या मनाला ही गोष्ट सतत टोचत राहते. सलत राहते की माझ्यामध्ये ही कमतरता आहे. तुमच्या पार्टनरने जर तुमच्यातली कमतरता दाखवून दिली तर तुम्हाला कसं वाटेल याचा विचार करा. कमतरता दाखवल्यामुळे आपल्या प्रेमामध्ये कडवेपणा येतो. आणि ही गोष्ट आपला पार्टनर आयुष्यभर विसरत नाही. त्यामुळे आपण आपल्या पार्टनर मधल्या कमतरता शोधू ही नयेत आणि कधी त्यांना त्या जाणवून देऊ नये. याउलट त्या कमतरता दूर करण्यासाठी त्यांच्या न कळत आपण प्रयत्न करायला हवेत. सुखी वैवाहिक जीवनाची हीच गुरुकिल्ली आहे.