जोडीदाराला द्यायचे असेल प्रणय सुख, तर वापर या सोप्या ‘ट्रिक्स’

तुम्ही त्याच्याबरोबर अशा गोष्टी बोलायला सुरूवात करा जेणेकरून तो किंवा ती उत्तेजित होईल. जोडीदाराचा मूड बदलतो आहे हे पाहून तुम्ही त्या पद्धतीने कपडे...

धकाधकीच्या जीवनात लैंगिक आयुष्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होत चालले आहे. खरं तर लैंगिक सुख हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे, परंतू स्पर्धात्मक जगात टिकाव लागण्यासाठी जो ताण घेतला जातोय त्यामुळे सेक्स लाईफ कंटाळवाणे होत असल्याचे पाहायला मिळत आहे.  सतत ऑफिसचं काम आणि न मिळणारा वेळ यामध्ये चिडचिड जास्त प्रमाणात वाढते. हीच गोष्ट सेक्स लाईफवरही परिणाम करत असते. कधीकधी तोचतोचपणादेखील रटाळवाणा होतो. मग अशावेळी आपल्याला प्रश्न पडतो की आपल्याला जोडीदाराला सेक्समध्ये नक्की कसं सुख देता येईल? आपल्या सेक्स लाईफमध्ये वेगळं काय करता येईल जेणेकरून हा कंटाळा आणि तोचतोचपणा निघून जाईल. याचा विचार करण्याची जास्त गरज नाही. आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगत आहोत जेणेकरून तुम्ही त्याचा उपयोग करून तुमच्या जोडीदाराला सेक्समध्ये अधिक सुख देऊ शकता आणि तुम्हालाही त्यातून आनंद मिळवता येईल.

जोडीदाराचा मूड बनविणे

तुम्हाला जर सेक्स करायचा असेल पण तुमच्या जोडीदाराचा मूड नसेल तर ही तुमची जबाबदारी आहे की, तुम्ही जोडीदाराचा मूड सेट करावा. तुम्ही त्याच्याबरोबर अशा गोष्टी बोलायला सुरूवात करा जेणेकरून तो किंवा ती उत्तेजित होईल. जोडीदाराचा मूड बदलतो आहे हे पाहून तुम्ही त्या पद्धतीने कपडे बदला आणि तिला  आवडतील असे कपडे घाला. जेणेकरून तिला तुमच्या अधिक जवळ यावंसं वाटेल. तुम्ही जितकं जास्त तिला सेक्ससाठी उत्तेजित कराल तितका तिचा मूड अधिक चांगला होईल आणि तुम्हालाही त्यातून आनंद मिळेल. कधीही डायरेक्ट सेक्सला सुरूवात करू नका. बोलून अथवा फोरप्ले करून मगच सेक्सला सुरूवात करा. त्यामध्येही नवनवीन खेळ शोधून काढा.

जोडीदाराला करा आकर्षित

सुरूवातीला जो आकर्षकपणा एकमेकांसाठी असतो तो काही वर्षांनी कमी होतो. पण तुम्हाला जर सेक्समध्ये सुख द्यायचं असेल तर ते आकर्षण वाढवायला हवे. तुमच्या नात्याला पुन्हा नवंपण देण्यासाठी तुम्हाला दोघांनाही एकमेकांसाठी वेळ देत एकमेकांना आकर्षित करण्याची गरज आहे. जुने घालवलेले क्षण पुन्हा नव्याने आठवा आणि ते क्षण पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करा. फोरप्ले करत जोडीदाराला अधिक आकर्षित करण्याचा प्रयत्न  करा. त्याला आवडतील असे अंतर्वस्त्र अथवा कपडे घाला जेणेकरून तो तुमच्याकडे अधिक आकर्षित होईल.

लाजणे सोडून द्या

तुम्ही तेव्हाच सेक्सचा आनंद घेऊ शकता जेव्हा तुम्हाला एकमेकांचा सहज स्पर्श होत असेल. कोणत्याही वेळी लाजणं हे तुम्हाला महागात पडू शकतं.  न लाजता तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर जितकं समरस व्हाल तितका तुम्हाला अधिक आनंद मिळेल. लाजल्यामुळे जोडीदाराचा जोश कमी होऊ शकतो. त्यामुळे सेक्स करताना सहसा मुलांना वाईल्ड सेक्स आवडतं, अशावेळी लाज सोडून त्याच्याशी समरस होऊन वाईल्ड सेक्स करण्याचा प्रयत्न करा. असं केल्याने तुम्हाला दोघांनाही अत्यानंद मिळेल आणि कंटाळवाण्या सेक्स लाईफमध्ये अधिक मजा येईल.

मास्टरबेट करून स्वतःचा मूड बनवा

मास्टरबेशनचा पर्याय यासाठी देण्यात येत आहे की, तुमच्या आरोग्यासाठी हे जास्त चांगलं आहे. इतकंच नाही तर तज्ज्ञदेखील मास्टरबेट करण्याचा सल्ला देतात. वास्तविक आपले सेक्शुअल लाईफ निरोगी ठेवण्यासाठी हे फायदेशीर आहे. कोणतेही नको ते औषध घेण्यापेक्षा तुम्ही परफॉर्मन्ससाठी मास्टरबेट करून स्वतःचा मूड बनवू शकता. हे तुम्हाला अधिक फायदेशीर ठरते.