कोरोनामुळे घटस्पोटाच्या प्रकरणात वाढ; सोबत जास्त वेळ घालविणे ठरतंय धोकादायक

चॅरिटी सिटीजेन एडवाईज या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार लोक नातं तोडण्यासाठी ऑनलाईन सल्ला शोधत आहेत. या प्रकारच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.अमेरिकेच्या एका लॉ फर्मचे म्हणणे आहे की घटस्फोटाच्या प्रकरणात ३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोनामुळे लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात मोठा परिणाम घडून आला आहे. दीर्घकालीन लॉकडाऊनमुळे अनेकांच्या मनावर परिणाम झालेला दिसून आला. यामुळे अनेक घरांमध्ये नात्यांमध्ये दुरावा आल्याचे आपण माध्यमांमधून वाचत किंवा ऐकत असतो.  कोरोनाच्या माहामारीमुळे जगभरात ब्रेकअप आणि घटस्फोटाची प्रकरणे वाढत आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या  माहितीनुसार कोरोना काळात लोकांच्या मानसिकतेवर परिणाम झाल्याने ब्रेकअप होण्याच्या घटना अजूनही वाढू शकतात. कारण  कोरोनाचा उद्रेक पुन्हा झाला तर पुन्हा अशी स्थिती उद्भवू शकते.

एका इंग्रजी माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार  इंग्लँडमध्ये राहत असलेल्या २९ वर्षीय महिला सोफी टर्नर आणि त्यांचे पती घटस्फोट घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या संकटाच्या आधीपासून य दोघांच्या वेगळं होण्याच्या चर्चा होत्या. पण माहामरीमुळे सोफी या ताण तणावाखाली असल्यामुळे त्यांचे लग्न तुटले. ब्रिटनमधील  कायद्यांचा अभ्यास करत असलेल्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जुलै आणि ऑक्टोबरमध्ये घटस्फोटाशी संबंधीत घटनांमध्ये १२२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

चॅरिटी सिटीजेन एडवाईज या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार लोक नातं तोडण्यासाठी ऑनलाईन सल्ला शोधत आहेत. या प्रकारच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.अमेरिकेच्या एका लॉ फर्मचे म्हणणे आहे की घटस्फोटाच्या प्रकरणात ३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोनामुळे घटस्फोटाच्या घटना चीनमध्येही पाहायला मिळाल्या आहेत. तर स्वीडनमध्येही अशीच परिस्थिती आहे. तज्ज्ञांचे म्हणणे असे आहे की कोरोनामुळे बर्‍याच लोकांचे आर्थिक नुकसान झाले आहे आणि लोक मानसिक आरोग्याच्या समस्येने ग्रस्त आहेत. या कारणांमुळे ब्रेकअपची प्रकरणे वाढली आहेत.