वैवाहिक जीवनातील आकर्षण संपलंय? मग हे नक्की वाचा

फक्त दोन गोष्टींना लक्षात ठेवाव्या की दक्षिण आणि दक्षिण पश्चिम दिशेस आपल्या लग्नाचा अल्बम किंवा एखादी भेट वस्तू नको आणि दक्षिण पश्चिमेस (नेऋत्य) दिशेला राधा-कृष्णाची मूर्ती किंवा चित्र नको.

  लग्नानंतर प्रत्येक जोडप्याचे काही न काही स्वप्नं असतात. प्रत्येक जोडपं आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करतं. जेव्हा दोन वेगवेगळ्या मताचे, स्वभावाचे व्यक्तिमत्व एकत्र राहण्यास सुरू करतात तर काही न काही वेगळं घडतच. दोन भिन्न मताचे व्यक्तिमत्व एकत्र आल्यावर वेगळं होणारच मग ते नवयुगल असो किंवा लग्नाला बरीच वर्षे झालेली जोडपी असो. त्यांच्यामध्ये समरसतेचा भाव नेहमीच असावा लागतो. यासाठी आपण वास्तूची मदत घेऊन देखील आपल्या नात्याला अधिक दृढ करू शकता.

  यासाठी काही वास्तू टिप्स आहेत, या टिप्सला अवलंबविल्याने आपले वैवाहिक जीवन चांगले होईल आपल्या जीवनातून तणाव कमी होईल आणि जोडपं एकमेकांना साहाय्य करतील. यासाठी आपल्याला दिशांच्या आधारे आपल्या शयनकक्षाला निवडायचे असते.

  १ नवं दांपत्यासाठी उत्तर किंवा उत्तर-पश्चिम दिशेकडे असलेले शयनकक्ष योग्य असतं. या दिशेला शयनकक्ष असल्यानं हे एकमेकांसाठी प्रेम आणि आकर्षण उत्पन्न करतं तसेच त्यांचा जिव्हाळ्याचे क्षण आनंदी बनवतात. या दिशेच्या प्रभावामुळे जोडप्यात सामंजस्य बनलेलं राहतं.

  २ या दिशेच्या शयनकक्षात १० वर्षा पेक्षा जास्त वयाच्या मुलांना झोपवू नये.

  ३ या व्यतिरिक्त आपण पूर्व-उत्तर-पूर्व दिशेला असणारे शयनकक्ष निवडतात, तर हे आपल्या जीवनात शांती बनवून ठेवत आणि आपल्याला पुराण्या गोष्टीमध्ये अडकण्यापासून वाचवत ज्यामुळे आपण जुन्या गोष्टींचा विचार करण्यात वेळ आणि मेंदू लावत नाही.

  ४ पती-पत्नी मधील प्रेमासाठी फक्त शयनकक्षाचेच नव्हे तर इतर काही वास्तू उपायानं कडे लक्ष देणे गरजेचे असते. जसे दक्षिण पश्चिमेकडे लग्नाचा अल्बम ठेवणे, फोटो ठेवणे किंवा लव्ह बर्डस ठेवणे.

  ५ फक्त दोन गोष्टींना लक्षात ठेवाव्या की दक्षिण आणि दक्षिण पश्चिम दिशेस आपल्या लग्नाचा अल्बम किंवा एखादी भेट वस्तू नको आणि दक्षिण पश्चिमेस (नेऋत्य) दिशेला राधा-कृष्णाची मूर्ती किंवा चित्र नको. असे असल्यास बाहेर स्त्री किंवा पुरुषाशी संबंध होऊ शकतात.