लॉकडाऊन ठरले सर्वाधिक ब्रेकअपचे कारण; जोडीदाराला भेटू न शकल्याचा परिमाण

. कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा जसा सामाजिक, आर्थिक घटकांवर परिणाम झाला आहे, तसाच तो अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील झाला आहे.

    गेल्या जवळपास एक वर्षापासून कोरोनामुळे मानवी जीवनात आमूलाग्र बदल झाल्याचे दिसून येते. अनेकांच्या जीवनात प्राथमिक प्राधान्य असलेल्या गोष्टींमध्ये मोठा बदल झाला. कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा जसा
    सामाजिक, आर्थिक घटकांवर परिणाम झाला आहे, तसाच तो अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील झाला आहे.

    कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे अनेक कपल्स एकमेकांना भेटू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नात्यात तणाव आणि दुरावा निर्माण झाला. परिणाम ब्रेकअपचे प्रमाण वाढले. आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, कोरोनामुळे गत वर्षी लक्षणीय प्रमाणात ब्रेकअप झाले आहेत.

    जोडीदाराला भेटू न शकणे हे प्रमुख कारण
    कोरोना महासाथीमुळे प्रत्येकालाच तणावाचा सामना करावा लागला. यामुळे अनेक कपल्स दुरावले, त्यांना भेटता आले नाही. परिणामी अनेक कपल्सचे ब्रेकअप झाले. गतवर्षी लॉकडाऊनमुळे लक्षणीय प्रमाणात ब्रेकअप झाले. माहितीनुसार, वुमेन फर्स्ट सोशल नेटवर्किंग अॅप बंबलने देशभरातील कपल्सच्या सहभागातून नुकताच एक सर्व्हे  केला. या सर्व्हेनुसार,  लॉकडाऊन दरम्यान दिल्लीत सर्वाधिक म्हणजेच २८ टक्के ब्रेकअप झाले. कोरोनामुळे प्राथमिकतेत झालेला बदल हा यामागील प्रमुख कारण आहे. बंबलच्या सर्व्हेनुसार, जोडीदाराला भेटू न शकणे हे ब्रेकअपचे प्रमुख कारण ठरले. ४६.४५ टक्के लोकांना असे वाटते की, लॉकडाऊनमुळे ते त्यांच्या जोडीदाराला भेटू शकले नाहीत, याचे पर्यावसन ब्रेकअपमध्ये झाले. ३ पैकी १ म्हणजेच २९ टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार, अस्तित्वात असलेल्या अडचणी, प्रश्नांनी महासाथीच्या कालावधीत उग्र रुप धारण केले. त्यामुळे आमच्यावर ब्रेकअपचे संकट कोसळले.