Live in Relationship Now what is the court order; Then, even parents cannot prevent 'them' from living together

अचानक नोकरी गमावल्यामुळे भारतातील महिलांच्या मानसिक आरोग्यावरही विपरित परिणाम झाला आहे. तथापि अनंत अडचणी असतानाही भारतीय महिला मात्र नाउमेद झाल्या नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. लाईफस्टाईलमध्ये बदल, वाढते शहरीकरण, पश्चिम संस्कृतीचा अंगिकार यामुळे भारतात महिला आणि युवतींमध्ये प्रेम आणि विवाहाबाबतही विचारसरणीत बदल झाला असल्याचे सर्व्हेक्षणात मत नोंदविण्यात आले आहे.

  दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग वाढला आणि लाकडाऊन जाहीर झाला. सतत वेगाने धावणारी दुनिया अचानक जागच्या जागी थांबली. लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. विशेषत: महिला वर्गाला याचा जास्त फटका बसला. अनेक महिलांना आपलं करियर सोडावं लागलं. या सर्वाचा महिलांच्या मानसिक आरोग्यावर आणि लव्ह लाईफवर गंभीर परिणाम झाला असून, ७२ टक्के महिला विवाहबाह्य संबधाच्या शोधत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

  कोविड-१९ मुळे अनेक भारतीय महिलांना आपले करियर सोडावे लागले आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीनुसार (सीएमआयई) लेबर फोर्समध्ये महिलांची सहभागीता कमी करण्यात आली असून ती आर्श्चजनक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

  अचानक नोकरी गमावल्यामुळे भारतातील महिलांच्या मानसिक आरोग्यावरही विपरित परिणाम झाला आहे. तथापि अनंत अडचणी असतानाही भारतीय महिला मात्र नाउमेद झाल्या नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. लाईफस्टाईलमध्ये बदल, वाढते शहरीकरण, पश्चिम संस्कृतीचा अंगिकार यामुळे भारतात महिला आणि युवतींमध्ये प्रेम आणि विवाहाबाबतही विचारसरणीत बदल झाला असल्याचे सर्व्हेक्षणात मत नोंदविण्यात आले आहे.

  प्राप्त आकडेवारीनुसार, टिंडर, बम्बल, हिंज, हॅपप्न, ओके क्यूपिडसारख्या डेटिंग अॅपचा वापर वाढला असून ७२ टक्के महिला डेटिंग आणि खऱ्या प्रेमाच्या शोधाबाबत मनमोकळेपणे बोलूही लागल्या आहेत.

  कोविड-१९ मुळे अधिकांश भारतीय महिलांना आपले करियर सोडून द्यावे लागले आहे. साथीच्या रोगामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत कामकाजाच्या स्थळी ७५ टक्के पुरुषांच्या तुलनेत आता महिलांची संख्या केवळ 11 टक्केच राहिली असल्याचे सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

  कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या महिला आता आपल्या आरोग्यावर लक्ष देण्यासह एखादा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भरता प्राप्त करण्याचे व उद्योजक होण्याचे स्वप्न पाहत आहेत. सर्व्हेक्षणानुसार ५५ टक्के अधिक महिलांनी आरोग्याव अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.

  साधारणत: कोणत्याही प्रसंगी पतीलाच ‘सॉरी’ म्हणावे लागते अशी तक्रार असते. परंतु गेल्या दोन महिन्यात सरासरी एका महिलेने 18 वेळा सॉरी शब्दाचा वापर केल्याचे सर्व्हेक्षणात स्पष्ट झाले आहे. त्यानंतर एका महिलेने 16 वेळा ‘लव्ह’ आणि 15 वेळा ‘हम्म’ या शब्दाचा वापर केला. अशा प्रकारे महिलांनी वर्षभरात ‘सॉरी’ शब्दाचा सर्वाधिक वापर केल्याचेही उघड झाले आहे.