relationship article

एखादी विवाहित स्त्री परपुरुषांबद्द नेमका काय विचार करते हा विचार अनेक पुरुष करतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की,  विवाहीत स्त्रियांच्या...

एखादी विवाहित स्त्री परपुरुषांबद्द नेमका काय विचार करते हा विचार अनेक पुरुष करतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की,  विवाहीत स्त्रियांच्या स्वत:च्या नवऱ्याविषयीसुद्धा शारिरीक आकर्षणाच्या भावना पुरुषांएवढ्या तीव्र नसतात.

स्त्री ही भावनाप्रधान आहे. नवऱ्याशी तिचे नाते बऱ्याचदा भावनेने जोडलेले असते. खुद्द नवऱ्यालाही तिला जिंकायचे असेल तर तिच्या भावना जपाव्या लागतात. स्त्री नवऱ्याला सुग्रास भोजन आणि शय्यासुख या दोन गोष्टींवर अंकित करून घेऊ शकते, पण स्त्रीमन पुरुषांपेक्षा सूक्ष्म आहे.

म्हणून असल्या युक्त्या तिच्यावर चालत नाहीत. बहुतेक विवाहीत स्त्रिया परपुरुषाकडे सरळ नजरेने पहातात. कुतूहल म्हणून रंगरूपाकडे पाहतातही! कधी प्रशंसाही करतील. पण तेवढंच! यापुढे जाऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची त्यांची मनीषा नसते. विवाहीत स्त्रिसाठी तिचे कुटुंब म्हणजे तिचे  नंदनवन असते.

शारिरीक नात्यात स्त्री प्राप्तकर्ती आहे आणि पुरूष हा प्रदान करणारा आहे. त्यांच्या मनाची रचनाही तशीच असते. त्यामुळे क्वचितच स्त्री शारीरिक संबंधाच्या बाबतीत पुढाकार घेते. मग ती स्त्री विवाहित असली तरी तिचा हा गुणधर्म कायम असतो.