तुम्ही परफेक्ट पार्टनर आहात का?; ‘हे’ ५ गुण बनवितात तुम्हाला परफेक्ट पार्टनर

आज कपल्स एकमेकांच्या आयुष्य नियंत्रणात ठेवण्याऐवजी पर्सनल स्पेस देत आहे. आज पती पत्नीवर 24 तास नजर ठेवत नाही तर पत्नीदेखील नव-याकडून प्रत्येक तासाचे अपडेट घेण्यास इंट्रेस्टेड नाहीये.

  पत्नी असावी तर सुंदर आणि घरेलू, पती असावा तर आज्ञाकारी आणि सुशील. आता या गोष्टी सोडून न्यू एज कपल्सला काही तरी वेगळी क्वालिटी आपल्या पार्टनरमध्ये हवी आहे. आज आम्ही तुम्हाला काही अशाच वेगळ्या क्वालिटी सांगणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या पार्टनरमध्ये बघता.

  १- इतरांपेक्षा वेगळे
  महिलांना हे ऐकल्यानंतर चांगले वाटते की, तिचा नवरा इमोशनल आणि सेंसिटिव आहे. दुसरीकडे पुरुषांना आपल्या पत्नीची गाडी चालवायला आणि किक बॉक्सिंग करणे आवडते. यासारखे छंद अथवा यासारखी फीलिंग्स पार्टनर्सबद्दल एकमेकांबद्दलचा आदर वाढवते.

  २-इच्छांना व्यक्त करणे
  आजचे पार्टनर्स एकएमकांबद्दल असलेल्या इच्छा मोकळेपणाने व्यक्त करतात.तर एकमेकांना भेटल्यानंतर देण्यात आलेल्या कॉम्प्लीमेंट्सला  सकारात्मक पद्धतीने घेतात. जर तुमच्या पत्नीने शॉर्ट अथवा वेस्टर्न ड्रेस परिधान केला असेल तर तिला तो घालू न देण्याऐवजी तिची स्तुती केली जाते.

  ३-जसे आहात तसेच राहा
  न्यू एज कपल्स एकमेकांना ते जसे आहेत तसेच पाहणे जास्ती पसंत करतात. याचा अर्थ भारी-भक्कम साडी आणि फॉर्मल सूटपासून हे कपल्स दूर राहणे पसंत करत आहेत. जर पतीला सिक्स पॅक एब्स नसतील तरी देखील तो वेस्टर्न ड्रेस परिधान करत असल्यास पत्नी मेकअप न करता राहणे जास्त पसंत करत आहे.

  ४-पर्सनल स्पेस
  आज कपल्स एकमेकांच्या आयुष्य नियंत्रणात ठेवण्याऐवजी पर्सनल स्पेस देत आहे. आज पती पत्नीवर 24 तास नजर ठेवत नाही तर पत्नीदेखील नव-याकडून प्रत्येक तासाचे अपडेट घेण्यास इंट्रेस्टेड नाहीये. दोघानाही हे माहित आहे की, एकमेकांना काही गोष्टींमध्ये स्पेस देणे गरजेचे आहे.

  ५-आत्मनिर्भर
  आज कपल्सला असे जोडीदार हवे आहे जे स्वत:चे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे. आजच्या कपल्सच्यामते प्रत्येक जन आत्मनिर्भर असणे गरजेचे आहे. ही एक स्ट्रॉंन्ग पार्टनर असण्याची निशाणी आहे.