म्हणून बहुतेक जण त्यांच्या पहिल्या प्रेमात होतात अपयशी; आश्चर्यकारक आहे कारण!

ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर मुला-मुलींमधले आकर्षण सर्वोच पातळीवर असते. कामेच्छाचा लावा आतमध्ये खदखदत असतो. भावनिकदृष्ट्याही प्रत्येकाला कुणीतरी आपले प्रिय असावे

    पहिल्या प्रेमाच्या आठवणी जवळपास प्रत्येकाच्याच आयुष्यात खोलवर दडलेल्या असतात. याचे कारण म्हणजे पहिल्या प्रेमाचे अपयश हे आहे.

    पहिले प्रेम यशस्वी झाल्याचे आपण कदाचितच ऐकले असेल. यामागे काही करणं आहेत. ती जाणून कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

    अनेकांचे पहिले प्रेम हे खरेतर आकर्षणातून निर्माण झालेले असते. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर मुला-मुलींमधले आकर्षण सर्वोच पातळीवर असते. कामेच्छाचा लावा आतमध्ये खदखदत असतो. भावनिकदृष्ट्याही प्रत्येकाला कुणीतरी आपले प्रिय असावे अशी तीव्र इच्छा मनात असते. यावेळी तो किंवा ती  किती कामवितो, ते  कुठल्या धर्माचा आहेत, त्यांचा परिवार कसा आहे, शिक्षण आणि भविष्य याचा फारसा विचार केला जात नाही.

    भावनिकदृष्ट्या गुंतत गेले की सगळ्या गोष्टी गौण वाटायला लागतात. कालांतराने आकर्षणाची गुंगी हळूहळू उतरायला लागते आणि वास्तविकतेचे भान येते. अशावेळी काही जण या नात्यातून काढता पाय घेतात तर काहींचे भांडण होऊन ब्रेकअप होतात.

    नाते जरी तुटले तरी त्या नात्याच्या आठवणी मात्र आयुष्यभरासाठी हृदयाच्या कप्यात कैद असतात. वयाच्या एका नाजूक वळणावर अनुभवलेले ते क्षण हृदयावर कोरले जातात आणि मागे राहतात त्या फक्त आठवणी.