स्वतःसाठी काढा निवांत वेळ

    कधीतरी काहीही काम न करता स्वस्त बसून राहण्यातही वेगळाच आनंद असतो. कधी तरी दुपारच्यावेळी एक झोप काढणे, चहा पीता पीता सुर्यास्त पाहणे किंवा एखादा दिवस कोणतीही कामे न करता पुस्तक वाचत राहणे. याला काहीजणे आळशीपणा असेही म्हणतील. पण हा आळस नसून स्वतःसाठी काढलेला निवांत वेळ असतो. आज आम्ही तुम्हाला असे सहा पर्याय देणार आहोत ज्यामुळे व्यस्त जीवनात तुम्हाला थोडा निवांतपणा मिळेल.

    कधीतरी काहीही काम न करता स्वस्त बसून राहण्यातही वेगळाच आनंद असतो. कधी तरी दुपारच्यावेळी एक झोप काढणं, चहा पीता पीता सुर्यास्त पाहणं किंवा एखादा दिवस कोणतीही कामं न करता पुस्तक वाचत राहणं. याला काहीजणं आळशीपणा असंही म्हणतील. पण हा आळस नसून स्वतःसाठी काढलेला निवांत वेळ असतो. असे काही पर्याय आहेत, ज्यामुळे व्यस्त जीवनात तुम्हाला थोडा निवांतपणा मिळेल.

    – दररोज किमान 10 मिनिटे काहीच न करण्याचे निश्चित करा. काहीही करायचे नाही म्हणजे विचारही करायचा नाही.

    – तुमच्या फोनला एक दिवस सुटी द्या. त्यादिवशी कोणालाही मेसेज करायचा नाही, तसेच कॉलही करायचा नाही. एवढेच नाही तर इंटरनेटसुद्धा वापरायचा नाही.

    – घरातल्या प्राण्यासोबत वेळ घालवा.

    – कोणत्याही बागेत जाऊन डोळे बंद करून काही वेळ शांत बसा. त्यावेळी पक्ष्यांचा आवाज, निसर्गाचा आवाद ऐकण्याचा प्रयत्न करा.

    – मला आता या कामासाठी वेळ द्यायचा आहे अशा त्रासिक भावनेने कामाला किंवा दिवसाला सुरुवात करू नका.

    – शांत बसताना खोलीत टीव्ही, व्हीडिओ किंवा म्युझिक सिस्टीम पूर्णपणे बंद ठेवा.