मुलाच्या वागण्यात झाला असेल ‘हा’ बदल; तर तो प्रेमात आहे

तो तुमच्या प्रत्येक हालचालींची काळजीपूर्वक नोंद ठेवेल. तुमच्याशी वागताना बोलताना तुम्हाला जे व जसे आवडेल तसेच वागण्या बोलण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

  कुणीतरी आपल्याकडे आकर्षित व्हावे… आपल्या प्रेमात बुडावे ही प्रत्येकीचीच नैसर्गिक अपेक्षा असते. हा निसर्गाचा नियम असून यात वावगे काहीच नाही. मित्र परिवारात वावरताना, असे प्रकार अनेकदा घडतात. मात्र अनेकांमधला नेमका आपल्याकडे आकर्षित होणारा कोण… हा प्रश्न प्रत्येकीला पडतो. याचे उत्तर मिळवणे फार कठीण नाही. जाणून घेऊ यामागील लक्षणे…

  तो पुढाकार घेईल
  पार्टीमध्ये वावरताना तुमच्या प्रत्येक गरजेकडे त्याचे पहिले लक्ष जाईल. तो पुढाकार घेऊन तुमची गरज आधी पूर्ण करेल. जर तुमचा तो मित्र फोनवर बोलत असेल तर तुम्ही समोर आल्यावर तो फोन ठेऊन लगेच तुमच्याशी बोलायला येईल. तुम्हाला वेळ देणे हे त्याचे पहिले प्राधान्य असेल. कुठल्या ना कुठल्या कारणाने तो सतत तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करेल.

  तुमच्या प्रत्येक गोष्टीची दखल
  तो तुमच्या प्रत्येक लहान-सहान गोष्टींची माहिती ठेवेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही स्वतःविषयी त्याला जे काही सांगाल ते त्याच्या कायम लक्षात राहील. कदाचीत तुम्ही ते विसराल पण तो मात्र सगळया गोष्टी स्मरणात ठेवेल.

  शारीरिक हालचालींची नोंद ठेवणे
  तो तुमच्या प्रत्येक हालचालींची काळजीपूर्वक नोंद ठेवेल. तुमच्याशी वागताना बोलताना तुम्हाला जे व जसे आवडेल तसेच वागण्या बोलण्याचा त्याचा प्रयत्न असेल. कुठल्या न कुठल्या कारणाने तो तुम्हाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करेल.
  मित्र परिवारात वावरताना ज्या मुलाकडून तुम्हाला अशी वागणूक मिळेल तो तुमच्याकडे आकर्षित झाला आहे असे समजावे.