husband fed up of wife

काही लोकांना अशा सवयी असतात ज्यामुळे त्यांचा पार्टनर नेहमी निराश असतो. छोट्या छोट्या चुका भांडणांना(quarrel In Relationship) सतत आमंत्रण देत राहतात. या चुका(Mistakes In Relation) टाळणे आवश्यक आहे.

  नात्यामध्ये(Relation) छोटी-मोठी भांडण होणं हे काही नवीन नाही. मात्र काहीवेळा पार्टनरच्या चुकांमुळे भांडण वाढत जातात. काही लोकांना अशा सवयी असतात ज्यामुळे त्यांचा पार्टनर नेहमी निराश असतो. छोट्या छोट्या चुका भांडणांना सतत आमंत्रण देत राहतात. या चुका टाळणे आवश्यक आहे. जाणून घेऊया अशा चुकांविषयी ज्या तुम्ही नात्यात वाद होऊ नये (Mistakes In relationship) म्हणून टाळायला हव्यात.

  १) सत्य लपवणं 

  hiding truthअनेक लोकांना आपल्याविषयीची माहिती लपवण्याची सवय असते. ते कुठे राहतात,कुठे नोकरी करतात,कुठे जातात अशा विषयांवर बोलणं ते टाळत असतात.अनेकदा भुतकाळातील गोष्टी लपवल्याने नात्यांमध्ये अडसर निर्माण होतो.

  २)चिडचिड

  angry partnerराग हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे हे माहिती असूनही आपण अनेकदा रागावतो. रागावण्याची सवय लागली असेल तर वेळीच स्वत:ला आवरा. एकच गोष्ट घेऊन बसून तुम्ही रागवत बसलात तर नातं बिघडत जाईल.

  ३) पैशांची मागणी

  गरजवंताची मदत करायला हवी मात्र तुमचा पार्टनर वारंवार पैशांची मागणी करत असेल आणि पैसै परत देत नेल तर सावधान होण्याची गरज आहे. आपल्या पार्टनरलला पैसै देताना विचार करा.

  ४) दोन नात्यांचा गुंता

  two relationsएकाचवेळी दोन किंवा अधिक नात्यामध्ये राहण्याची सवय एखाद्याला असेल तर त्याची वारंवार भांडण होत राहतात. तुम्ही तुमच्या एका पार्टनरसोबत लॉयल राहिलात तर नात टिकेल नाहीतर दुरावा वाढेल.