parents

आईवडिलांनी मुलांचे संगोपन (Parenting)करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते आपण जाणून घेऊयात.

    आई वडील(Mother and Father) होणं याचा अर्थ फक्त मुलांना जन्म देणं असं नाही. मुलांचे योग्य पालन पोषण होणंही आवश्यक आहे. मुलांचे योग्य संगोपन ही पालकांची जबाबदारी आहे. मुलांचे चांगले संगोपन हा आदर्श समाजासाठीचा पाया आहे. लहानपणी तुम्ही मुलांना जे काही शिकवता त्या गोष्टी त्यांच्या आयुष्यावर परिणाम करत असतात.

    लहानपणीचे चांगले संस्कार आयुष्यभर उपयोगी ठरतात. तुम्ही अशा अनेक लोकांना पाहिलं असेल ज्यांच्याकडे कलागुण असतात पण आत्मविश्वास कमी असतो.याची अनेक कारणे आहेत. मात्र लहानपणीच्या अनेक गोष्टी यासाठी कारणीभूत असतात. आईवडिलांनी मुलांचे संगोपन करताना(Parenting Tips) कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते आपण जाणून घेऊयात.

    • मुलांना कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये बिझी ठेवणं आवश्यक आहे. अशा कामांमध्ये त्यांना रमवण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे त्यांची क्रिएटीव्हिटी वाढेल. यामुळे मुलांची एनर्जी योग्य पद्धतीने वापरली जाते. उदाहरणार्थ – तुमचं मुल जर पेंटींग करत असेल तर त्याच्या चुका काढण्याऐवजी त्याला योग्य पद्धत शिकवून त्याच्या कामाचे कौतुक करा.
    • लहान मुलांना सारखं मारल्याने त्यांना असुरक्षित वाटू लागतं. त्यांना सतत असं वाटत की आईबाबा त्यांच्यावर प्रेम करत नाहीत.ते वाईट आहेत, असंही वाटंत. ते घाबरायला लागतात.त्यामुळे त्यांना जास्त मारू नका.
    • प्रत्येक मुलाच्या समस्या वेगळ्या असतात. तुमच्या मुलाची तुलना दुसऱ्या मुलांशी करु नका.यामुळे त्यांची चिडचिड वाढते. ते स्वत:ला कमी समजू लागतात. आपल्या मुलाच्या चांगल्या गोष्टी समजून घेऊन त्यात तो उत्कर्ष कसा साधू शकतो, हे त्याला समजावून सांगा.