‘या’ पाच कारणांमुळे पत्नी शारीरिक संबंधासाठी देते नकार; प्रत्येक पतीला असावे माहिती

आपली पत्नी असे का वागते यामागचे उत्तर अनेक पुरुषांना माहिती नसल्याने नात्यांमध्ये कटुता येते व सांसारिक कलह वाढतो. त्यामुळे यामागचे कारण जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. 

  धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या आयुष्यात मोठा बदल झाला.  रात्रंदिवस  आपण कोणत्या ना कोणत्या कामामध्ये व्यस्त असतो, त्यामुळेच अनेक लोकांना वेगवेगळे आजार जडत आहेत. लोकांचा ताणतणाव वाढत आहे, तर काही लोक मानसिक आजाराने ग्रस्त आहेत.

  आणि या सर्व गोष्टीचा परिणाम हा आपल्या काम जीवनावर होत आहे, आणि प्रत्येक व्यक्तीला मग ती स्त्री असो किंवा पुरुष प्रत्येक जोडप्याला इतर सुखां प्रमाणेच शरीरसुखसुद्धा  हवं असतं. पण नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात  अनेक पुरुषांनी एक समस्या मांडली आहे, ती म्हणजे त्यांची पत्नी शरीर संबंधामध्ये पहिल्या सारखा रस घेत नाही, इतकेच काय तर त्यावर खुलेपणाने बोलतही नाही.

  आपली पत्नी असे का वागते यामागचे उत्तर अनेक पुरुषांना माहिती नसल्याने नात्यांमध्ये कटुता येते व सांसारिक कलह वाढतो. त्यामुळे यामागचे कारण जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

  बाळाचा जन्म:- जगातील प्रत्येक स्त्रीला हा क्षण हवा असतो, आणि या क्षणासाठी प्रत्येक स्त्री आनंदाने वाट पाहत असते, पण जेव्हा एखादी स्त्री आपल्या पहिल्या बाळाला ज न्म देते तेव्हा तिच्या आरोग्यामध्ये अनेक चढ उतार येऊ लागतात. यामुळे स्त्रियांच्या अनेक हार्मोनसमध्ये मोठ्या प्रमाणत बदल होतो.  नैसर्गिकपणेच स्त्रियांचा आपल्या काम जीवनामधील रस कमी होतो.

  सेक्सुअल डिसफंक्शन:- हा एक प्रकारचा आजार आहे, ज्यामध्ये स्त्रीला अजिबात कामक्रीडा करण्याची इच्छा नसते, कारण या आजारांमध्ये महिलांच्या गुप्तांगामध्ये खूप मोठा बदल झालेला असतो, त्या भागात त्यांना अधिक वेदना होत असतात, यामुळे स्त्रीचा या गोष्टीतील रस कमी होतो. या वैद्यकीय स्थितीसाठी, डॉक्टरांशी संपर्क साधणे आणि पूर्ण उपचार घेणे फार महत्वाचे आहे.

  तणावपूर्ण जीवन:- आपल्याला माहित आहे की, आपले सध्याचे आयुष्य किती व्यस्त आहे. घरी आणि बाहेरील जबाबदारी, कामाचे तणावात रूपांतरित होते. अशा परिस्थितीत झोपेच्या अभावामुळे आणि शारीरिक आणि मानसिक ताणामुळे  हार्मोनल संतुलन बिघडते. त्यामुळेसुद्धा स्त्रियांचा शरीर संबंधांमधला  रस कमी होतो.

  औषधांचा परिणाम:- आजकाल अनेक महिला या धावत्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त आहेत, त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या औषधाचे सेवन करावे लागते, आणि हीच औषधे त्याची काम जीवनामधील असणारी आवड कमी करतात. तर अशावेळी महिलांनी वैद्यकीय सल्ला घेणे खूप महत्वाचे आहे.

  नात्यामध्ये आलेला दुरावा:- स्त्रियांच्या काम जीवनामध्ये रस कमी होण्यामागे  हे कारण खूप महत्वाचे आहे. बहुतेक वेळा असे दिसून येते की, पती आपल्या पत्नीचा आदर करत नाही. एखादा पुरुष तेव्हाच प्रेमाने बोलतो जेव्हा त्याला स्त्रीची गरज असते. दररोजची भांडणं किंवा मतभेद देखील एखाद्या महिलेचा शारीरिक संबंधाबद्दलचा रस कमी करतात.