पुरुषांमधल्या या गोष्टी स्त्रियांना करतात आकर्षित; तुमच्यामध्ये आहे का ‘हे’ गुण

  रूप तुझे हे पाहता भान माझे हरपूनी जावे, तुझा स्पर्श होता मी स्वतःस विसरूनी जावे”. मित्रांनो प्रेम, आकर्षण या सर्व गोष्टी आपल्याला ठाऊकच आहेत. स्त्रीचे सौंदर्य हे कोणत्याही पुरूषाला अगदी सहज आकर्षित करते. म्हणून तर पूर्वीच्या काळात राजे- महाराजे यांना हरवण्यासाठी किंवा त्यांचे राज्य मिळवण्यासाठी “सुंदर स्त्री” ला हाताशी धरले जाऊन ङावपेच खेळले जात.

  अहो, पण फक्त पुरुष स्त्रीच्या सौंदर्यावर आकर्षित होतो, असे मुळीच नाही बरं का. कारण स्त्रिया देखील पुरुषांच्या सौंदर्यावर मनापासून फिदा होतात. इतकंच नव्हे तर पुरूष जसे गोर्यागोमट्या, लांबसडक काळेभोर केस, सङपातळ बांधा, सुडौल शरीर अशा प्रकारच्या स्त्रियांवर आकर्षित होतात.

  अगदी त्याचप्रमाणे स्त्रियांच्या देखील काही विशेष प्रकारचे सौंदर्य असलेले पुरुष मनात भरतात. पण अशा कोणत्या गोष्टी आहेत बरं ज्या स्त्रियांना पुरूषांवर प्रेम करण्यास भाग पाडतात. मित्रांनो आज आम्ही तुम्हांला याच सिक्रेट टिप्स सांगणार आहोत.

  पुरूषांमधील या गोष्टी आवडतात प्रत्येक स्त्रीला :

  तरुण आणि आकर्षक शरीरयष्टी : प्रत्येक स्त्री ही पुरूषाची उंची त्याची पिळदार शरीरयष्टी पसंत करते. रंग, रूप पाहण्याआधी त्या उंचीकङे लक्ष देतात. लांबसडक उंची, पिळदार शरीर हे प्रत्येक स्त्रीला आकर्षित करते. तर मित्रांनो तुम्हांला जर मूलींच्या नजरेत भरायचे असेल तर मग व्यायाम, योगा आणि जीम करायला आजपासूनच सुरुवात करा आणि सुंदर, ङौलदार, पीळदार आणि ङोले- शोले असलेली शरीरयष्टी बनवा.

  पुरूषांवर घराची जबाबदारी जास्त असल्यामुळे त्यांना कमजोरी आणि थकवा अशा समस्या निश्चितच जाणवतात. परंतु मित्रांनो मूलींना नेहमी टवटवीत आणि ताजेतवाने दिसणारे पुरूष आवडतात. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या आरोग्याची नियमितपणे काळजी घ्या आणि हो त्याचबरोबर प्रत्येक क्षणोक्षणी प्रसन्न हसतमुख राहा.

  जोडीदाराला वेळ देणे : आपल्याला तर ठाऊकच आहे की, स्त्रियांना अगदी लहानसहान गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे जर तुम्ही विवाहित असाल किंवा एंगेज असाल तर आपल्या जोडीदाराची नित्यनेमाने काळजी घ्या.

  प्रत्येक नवनवीन गोष्टीत आपल्या पार्टनरचे गोङ कौतुक अवश्य करा. आपल्या कामातच गुंग न राहता दररोज आपल्या जोडीदाराला पुरेपूर वेळ द्या. रोमॅन्टिक वातावरणात काही प्रेमाच्या गुजगोष्टी करा. अशाप्रकारे आपल्या पार्टनरला खुश करा

  आनंदी- हास्यमय स्वभाव : ह’ल्लीच्या धावपळीच्या जगात सर्वांनाच खूप कामाचा ताणतणाव आहे. परंतु चिंतेत राहिल्याने तुमच्या आरोग्यावर तर परिणाम होतोच. पण त्याचसोबत तुमच्या नात्यावर देखील याचा खोल परिणाम होतो. कारण स्त्रियांना सेन्स ऑफ ह्युमर उत्कृष्ट असलेले पुरुष खूप आवडतात. जे ताणतणावांपासून दूर राहून नेहमी आनंदात राहतात. त्याचसोबत त्यांचे विचार सुद्धा इतरांपेक्षा वेगळे व हटके असतात.

  सतत नकारात्मक विचार करणारे पुरुष स्त्रियांना मुळीच आवङत नाही. कारण स्त्रिया नेहमी हसतमुख आणि उत्साही अशा पुरूषांवर आकर्षित होतात. जी व्यक्ती स्वतः देखील आनंदात राहील आणि इतरांना सुद्धा आनंदात ठेवते, अशा व्यक्तिमत्त्वाचे पुरुष स्त्रियांना आवडतात.