Breakups are followed by rape allegations; Shocking statement of the chairperson of the women's commission

एका पुरुषानं रिलेशनशिप एक्सपर्टकडे(Relationship Expert) मदत मागितली. या व्यक्तीनं एका वृत्तपत्राच्या कॉलममध्ये आपल्या लव्ह लाईफबाबतच्या (Love Life) समस्या मांडल्या आहेत.

    नात्यामध्ये (Relations) अनेकदा वेगवेगळी वळणं येत असतात.काहीजण त्यावर तोडगा काढतात तर काहीजण कुणाची तरी मदत घेतात. एका पुरुषानं रिलेशनशिप एक्सपर्टकडे (Relationship Expert)मदत मागितली. या व्यक्तीनं एका वृत्तपत्राच्या कॉलममध्ये आपल्या लव्ह लाईफबाबतच्या (Love Life) समस्या मांडल्या आहेत.

    या व्यक्तीनं लिहिलं, की लॉकडाऊनमध्ये (Lockdown) माझं एका विवाहित महिलेसोबत अफेअर सुरू झालं. माझ्यासोबत असताना तिला जे अनुभवता येतं ते याआधी तिनं कधीच अनुभवलं नाही. मीदेखील तिच्याबाबत असाच अनुभव घेत होतो. ती विवाहित होती, मात्र पतीसोबत झालेल्या भांडणांमुळे तिनं आपल्या पतीला सोडलं होतं. मीदेखील विवाहित (Married) होतो. मात्र, पत्नीसोबत फार न जुळल्यानं मीदेखील तिच्यापासून वेगळं झालो होतो. आता आम्ही दोघं सोबत एका नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी तयार होतो.मात्र, काही दिवसातच मला हे समजलं की ती प्रेग्नंट (Pregnant) आहे. याचा परिणाम आमच्या नात्यावरही झाला. आम्हाला दोघांनाही मुल हवं होतं पण ते इतक्या लवकर होईल, असा विचार आम्ही केला नव्हता. मी ही परिस्थिती सांभाळू शकत नव्हतो आणि हळूहळू आम्ही एकमेकांपासून दूर जाऊ लागलो. मात्र, मला हे नातं संपवायचं नव्हतं.

    काही दिवसातच त्या महिलेने अर्थात जे हिनं मला एक स्कॅन रिपोर्ट पाठवला आणि सांगितलं की तिच्या होणाऱ्या बाळाचा बाप तो नसून तिचा आधीचा पती आहे. यासोबतच जेनं असंही म्हटलं की, आता तिला माझ्यासोबतच नातं संपवायचं आहे. मी बऱ्याच पद्धतीनं रिपोर्ट तपासण्याचा प्रयत्न केला कारण मला असंच वाटत होतं की ते बाळ माझंच आहे. मात्र जेनं याला पूर्णपणे नकार दिला आणि वारंवार तिनं हेच सांगितलं की तिचा नवराच या मुलाचा बाप आहे.

    जे हिनं म्हटलं की, आता तिला आरामात आणि शांततेत आयुष्य जगायचं आहे. ती आपल्या पतीसोबतचं नातं सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या पतीला माझ्याबाबत काहीही माहिती नाही. तिनं माझ्यासोबतचा संपर्क तोडला आहे. मी आतून तुटलो आहे आणि मला हे नातं संपवायचं नाही. मात्र मला तिला नाराजही करायचं नाही. मी त्या बाळासाठी दर महिन्याला पैसे वाचवून ठेवतोय, जेणेकरून भविष्यात गरज पडल्यास मी तिची मदत करू शकेल. हे बरोबर आहे की चुकीचं माहिती नाही. प्लीज माझी मदत करा.

    रिलेशनशिप एक्सपर्टनं म्हटलं, की जर जे हिनं आपल्या पतीला घटस्फोट दिला नसेल तर या बाळावर तुमचा कायदेशीर काहीही हक्क नाही. मात्र, सत्य जाणून घेण्यासाठी तुम्ही बाळाच्या जन्मानंतर त्याची डीएनए टेस्ट करू शकता. मात्र, यासाठी जे हिची परवानगी घ्यावी लागेल. हे बाळ तुमचंच आहे याची तुम्हाला पूर्ण खात्री असेल तर तुम्ही याबाबत कोर्टात मदत मागू शकता. हे प्रयत्न तुम्ही तेव्हाच करा, जेव्हा तुम्ही आयुष्यभरासाठी या बाळाची साथ देण्यास तयार असाल.