Promise-Day

व्हॅलेंटाईन वीकमध्ये(valentine week) पाचव्या दिवशी(११ फेब्रुवारी) म्हणजेच आज प्रॉमिस डे(promise day) आहे.  हा दिवस प्रेमी युगुलांसाठी खास(promise day special) आहे.

    व्हॅलेंटाईन वीकमध्ये(valentine week) पाचव्या दिवशी(११ फेब्रुवारी) म्हणजेच आज प्रॉमिस डे(promise day) आहे.  हा दिवस प्रेमी युगुलांसाठी खास(promise day special) आहे. या दिवशी आपल्या पार्टनरला आयुष्यभराची साथ देण्याचे वचन तर दिले जातेच पण काही आणखी वचने देणंही आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरला कोणती वचन देऊ शकता, ते आपण जाणून घेऊयात.

    या प्रॉमिस डे ला तुमच्या नात्यामध्ये तुम्ही कायम पारदर्शकता ठेवाल, असे वचन द्या. घटना कोणतीही असो तुम्ही ती कधीच आपल्या जोडीदारापासून लपवणार नाही, असे वचन द्या.

    प्रॉमिस डेला असं वचन द्या की वय वाढत गेल तरी तुमचं प्रेम कायम चिरतरुण राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. तुमच्या जोडीदाराने केलेल्या गोष्टींना नाव न ठेवता त्यांचा स्वीकार कराल. असे केल्याने तुमचे नाते अधिक दृढ होईल.

    नात्यामध्ये कधीही ईगो येऊ देऊ नका . कारण तुम्हाला तुमच्या नात्यापेक्षा ईगो महत्त्वाचा वाटायला लागला तर नात्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. तुमचा पार्टनर दुखावला जाऊ शकतो.

    आयुष्यात आपण अनेक गोष्टी करू असे आपण आपल्या लाईफ पार्टनरला सांगतो. मात्र कालांतराने आपण त्या विसरुन जातो. दिलेली वचने पाळण्याचा पूर्ण प्रयत्न करा. तुमच्या जर एखादी गोष्ट लक्षात राहत नसेल तर लिहून ठेवा. कोणत्याही नात्यामध्ये विश्वास ढळू देऊ नका. तर तुमचे नाते चांगले राहील.