मुलीचे प्रेमप्रकरण कळल्यावर वडिलांना पडतात ‘हे’ प्रश्न!

यामध्ये आपल्या जीवनात कधीतरी अपयश आल्यास किंवा नोकरीत किंवा अगदी घरातसुद्धा कांही कारणांमुळे थोडं कुठं मनाविरुद्ध झालं, याशिवाय अपयश आलं. की मग अशा कठिण काळात त्या संकटाशी तोंड देण्याऐवजी..

  आज सकाळी 10.30, 11 झोपेतून उठलेल्या आपल्या मुलीला तिचे वडील बोलू लागले. “मग् भविष्याबाबत काय ठरवलंस तू? हे असंच रोज उशिरा उठायचं? कसतरी आवरायचं? घरात एक शब्दही कुणाशी न बोलता उदास नाराजीनं वावरायचं? हे असं एकाकी जीवन कधी पर्यत?

  दिवसभर आई घरकामात,तर मी ऑफिसला गेल्यावर ,तू पुन्हा स्वतःला बेडरूमध्ये आंत बंद करुन, तासंतास रडत बसत असतीस, असेआई सांगत होती! त्यावर ती मुलगी म्हणाली की, तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय, तसं काहीच नाही! सद्या माझी तब्बेत थोडी खराब असते,आणि त्यामध्येच परीक्षासुद्धा जवळ आलीये, म्हणुन खोलीत आतंच अभ्यास करीत बसते.

  त्यावर वडील थोडयाशा मोठया आवाजत म्हणाले की, म्हणजे आई बोलते ते सगळं खोटंय का त्यामध्ये तुझ्या मैत्रिणीणं आईला फोन आला होता की, तुझ्यावर बारीक लक्ष तसेच सांभाळायला आणि तुझी खूप काळजी घ्या, असे तिने आईला सांगितले आहे. इकडचा तिकडचा विचारत बसण्यापेक्षा, स्पष्टचं बोलायचं म्हणजे तुझं कांय ब्रेकअप झालं आहे कांय?

  त्यामुळे तू अस तणावात जगत आहेस काय? कारण मोबाईल पासून,एक सेकंदही दूर न राहणारी तू, तोसुद्धा ऑफ करुन ठेवलाय तू? असं काय झालंय की,तू आम्हाला सांगत नाहीस. आजकात तू स्वतः च्याच दुनिययेत राहत आहेस. मग यावर ती मुलगी सगळं घडलेला प्रकार सांगू लागली आणि तसेच स्वतःला मिळालेला प्रेमातील धो-क्याची कबुलीही तिने दिली होती,

  ती बोलू लागली की,”माझं हसू हिरावून घेऊन,त्यानें प्रेमात धोका दिलाय मला!कारण आता दुसरी कुणी आलीये त्याच्या आयुष्यात म्हणून तो मला सतत टाळाण्याचा पर्यत करत आहे. त्याने तेव्हा माझा मनाचा थोडा देखील विचार केला नाही.मी कारण विचारले ,रडले शपथ घातली. शेवटी आत्महत्या करेन धमकीही दिली,

  पण त्याला काहीच फरक पडला नाही, तो अगदी सहज इतकी सुंदर मैत्री तोडून गेला. पण मी नाही विसरू शकत त्याला.त्यावर तिचे बाबा म्हणाले की, “हा तर तुला खुपच वाईट प्रकारे त्याने धोका दिल,मग आत्ता तू काय करणार पुढे, आत्महत्या?  कसा जीव देणार? पण तुला आत्ता अशा प्रकारे मोठा धोका मिळाल्यामुळे, तू पुढे काय करणार, कशी आत्महत्या करणार आहेस ?

  गळफास घेऊन? विष पिऊन? इमारतीवरून उडी मारून? का रेल्वेखाली झोपुन?  या व्यतिरिक्त फेसबुकवर पोस्ट टाकून का, व्हिडीओ अपलोड करुन? काय त्या मुलाने धोका दिला अशी, जबाबदार धरून, चिठ्ठी लिहून? कारण तू आधीच आम्हला सावधान केलीस तर आम्ही मनाची तयारी करण्यास मदत होईल.

  कारण तुला लहानशी सर्व प्रकारच्या मागण्या आणि हट्ट पूर्ण करून,  तुला सुखात वाढविले आम्ही, याशिवाय चांगलं राहणीमान, आणि शिक्षण देतोय,इतके  देऊनही, तू काल परवा ओळख झालेल्या त्या मुलांसाठी स्वतःला त्रास करून घेत आहेत. तसेच जीव द्यायला तयार झालीस तू ?

  त्यावर ती मुलगी थक्क होऊन वडिलांना म्हणाली की, नाही बाबा मी तुम्हाला सांगणारच होतो,पण तुमच्या दोघांसमोर समोर बोलण्याची कधी हिम्मतच झाली नाही.कारण ज्याला स्वतःचे सर्वस्व मानलं, त्यानंच मला धोका दिला होता. खरे तर, आजकालची युवा पिढी असा प्रेम प्रकरणात,ही मुलं आई-वडिलांकडे आपले शत्रू म्हणूनच का बघतात. कारण त्या बरोबर या सर्व गोष्टी शेअर करीत नाही.

  यामध्ये आपल्या जीवनात कधीतरी अपयश आल्यास किंवा नोकरीत किंवा अगदी घरातसुद्धा कांही कारणांमुळे थोडं कुठं मनाविरुद्ध झालं, याशिवाय अपयश आलं. की मग अशा कठिण काळात त्या संकटाशी तोंड देण्याऐवजी, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याऐवजी,या युवा पिढीला फक्त आत्महत्या हाच एकमेव पर्याय दिसत आहे.

  मग या अशा तणावातील, वातावरणात कोणीच काहीच बोलले नाही.परंतु पुढच्या काही सेकंदात तिने आपल्या वडिलांचे पाय धरले आणि “बाबा माफ करा मला! चुकले मी! तुम्ही भानावर आणलंत मला! नाहितर खरंच काहीतरी भयंकर घडणार होतं माझ्या हातून!” असे बोलू लागली.