तरुणाईंची अरेंज्ड मॅरेजपेक्षा प्रेमविवाहाला पसंती; ‘हे’ आहे कारण

विवाहसोहळा हा दोन मनांनाच नव्हे तर दोन कुटुंबांना जोडणारा सोहळा असतो, असे आपल्याकडे म्हणतात. ‘शादी के लड्डू खाएं तो भी पछतायें; न खाएं तो भी पछतायें’… लग्नाबाबत प्रत्येक भाषेत या अर्थाची म्हण, वाक्प्रचार असतोच. दुसरीकडे ‘लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात’ असे म्हणत लग्नाची अपरिहार्यताही बऱ्याचदा व्यक्त होते. लग्नाशिवाय राहिलेल्या माणसाकडे समाज वेगळ्या नजरेने बघतो. प्रत्येकाचे लग्न झालेच पाहिजे, ते वेळच्या वेळी झाले पाहिजे आणि ते यशस्वीच झाले पाहिजे, हा एकमेव समज बाळगत याआधीच्या पिढ्या जगल्या. पण, हळूहळू चित्र पालटतंय. आता तरुणाई अरेंज्ड मॅरेजपेक्षा प्रेमविवाहाला पसंती देत आहेत (Young people prefer love marriage over arranged marriage). यामागची कारणे आज आपण जाणून घेऊया.

 

विश्वास

लव्ह मॅरेज मागचे पाहिले कारण हे विश्वास असते. दोन व्यक्तींमध्ये जर विश्वास असले तर आयुष्यभर एकमेकांना साथ देऊ शकतात. जेव्हा अरेंज्ड मॅरेज केले जाते तेव्हा विश्वासाला जागाच नसते. कारण आपण आयुष्यात पहिल्यांदा ज्या व्यक्तीला भेटतो त्याच्या सोबत थेट आयुष्य काढण्यासाठी मनाची तयारी करावी लागते आणि असे नाते कितपत सुखी राहील याची शाश्वती नसते. पण या ऐवजी लव्ह मॅरेज मध्ये आपण आपल्या जोडीदाराला आधीपासूनच ओळखत असल्याने या व्यक्तीशी आपले पटेल की नाही हे आधीपासूनच आपल्याला माहित करून घेणे सोपे जाते आणि एक विश्वास तयार होतो की हा व्यक्ती आयुष्यभर आपली साथ देईल.

पंसत

अरेंज्ड मॅरेज मध्ये व्यक्तीला आपल्या पसंतीची वा आवडीची व्यक्ती सहसा निवडता येत नाही. फार कमी समाज असे आहेत जेथे ज्या व्यक्तीला लग्न करायचे आहे त्याचे मत विचारात घेतले जाते. नाहीतर सहसा आपल्या तोलामोलाचे स्थळ बघून थेट लग्न लावून दिले जाते. ना मुलाला त्याची पसंत विचारली जाते, ना मुलीला! पण लव्ह मॅरेजमध्ये आपल्या आवडीच्या व्यक्ती सोबत आणि आपले ज्याच्यावर प्रेम आहे अशा व्यक्तीचीच निवड करण्याचे स्वातंत्र्य असते आणि एकंदर सुखी संसाराच्या दृष्टीने ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असते.

पहिल्या रात्रीची भीती

ही भीती खास करून मुलींना असते. आपण ज्या व्यक्तीला आजवर कधीच भेटलो नाही, ज्याची आणि आपली २ दिवसांचीही धड ओळख नाही तो त्या रात्री आपल्याशी कसा वागेल? आपल्याला समजून घेईल का? आपल्या मनावरचे दडपण समजून घेईल का? असे नानाविध प्रश्न मुलींच्या मनात असते. लव्ह मॅरेज मध्ये आधीच रिलेशनशिप मध्ये असल्याने आपल्या जोडीदाराचा स्वभाव मुलीला माहित असतो. साहजिकच पहिल्या रात्रीबद्दल अनेक चर्चा झालेल्या असतात. स्वप्ने रंगवलेली असतात. शिवाय लैंगिक संबंधांबाबत त्या मुलाचा दृष्टीकोन समंजसपणाचा आहे हे कळले असल्याने लव्ह मॅरेजबाबत मुली निश्चिंत असतात.

स्वप्नांना पाठींबा

मुलगा असो वा मुलगी दोघांनाही असा जोडीदार हवा असतो जो त्यांच्या स्वप्नांना समजून घेईल आणि प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी मागे ठामपणे उभा राहील. अरेंज्ड मॅरेजमध्ये आपला जोडीदार आपल्याला समजून घेईलच याची खात्री नसते. त्यामुळे सहसा अरेंज्ड मॅरेज मध्ये थेट संसारालाच लागावे लागते. मात्र लव्ह मॅरेज मध्ये दोघांनाही आपापल्या स्वप्नांची माहिती असते आणि त्यासाठी कोणत्याही खस्ता खाण्याची आणि एकमेकांच्या मागे उभे राहण्याची तयारी असते. आजच्या तरुण पिढीने लव्ह मॅरेज मागे धावण्याचे हे एक मुख्य कारण आहे.

स्वभाव

हा एक असा घटक आहे जो अरेंज्ड मॅरेजमध्ये ना मुलाला समजून घेता येत ना मुलीला, जर मने आणि स्वभाव जुळलेच नाहीत तर ते नाते किती रटाळ असेल! हेच मत लव्ह मॅरेजला पाठींबा देणाऱ्यांकडून मांडले जाते. त्यांच्या मते ज्या व्यक्तीचा आपल्याला स्वभवाच माहित नाही तर त्यासोबत आयुष्य कसे घालवणार? त्यापेक्षा इतर कोणत्याही व्यक्तीला जाणून घेऊन व त्याचा स्वभाव पाहून मग त्यची जोडीदार म्हणून निवड करणे योग्य आहे. तर मंडळी ही आहेत काही कारणे ज्यामुळे आजच्या तरुण पिढीचा कल हा लव्ह मॅरेजकडे जास्त आहे.

सोशल स्टेटस

सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. लोक तुम्हाला वैयक्तितरित्या जाणून घेण्यापेक्षा तुम्ही सोशल मीडियावर काय वागता काय करता यावरून तुमच्याबद्दल मत बनवतात. अशावेळी पती व पत्नी दोघे जेव्हा सोशल मीडियाचा वापर करत असतात तेव्हा त्यांनी शक्य तितकं आपलं आयुष्य खाजगी ठेवायला हवं. एखादं भांडण झाले व वाद झाला तर भावनात्मक पोस्ट टाकू नये. यातून तुमचे फॉलोअर्स तुमच्या नात्यातील बेबनाव लगेच ओळखून त्याबद्दल प्रश्न करू शकतात.

सार्वजनिक वाद

कपल्सने स्वत:ला एक बंधन अवश्य घालावं ते म्हणजे कितीही काही झाले तरी सार्वजनिकरीत्या इतर लोकांमध्ये असताना वाद घालणार नाही. जेव्हा एखादा जोडीदार आपल्या भावनांना नियंत्रित न करता सर्वांसमोर वाद घालतो वा उलट सुलट बोलतो तेव्हा त्यातून नात्यातला पोकळपण जाणवतो आणि ती गोष्ट शरमेची सुद्धा होऊन जाते. अशा प्रकारच्या गोष्टी लोकांना चघळायला पुरेश्या असतात. घरी गेल्यावर तुमच्यातला वाद मिटून जातो पण लोकांच्या अफवा थांबत नाहीत.

एकमेकांबद्दल बोलणे टाळावे

पुरुषांनी आपल्या मित्रांमध्ये असताना आणि स्त्रियांनी आपल्या मैत्रिणींसोबत असताना आपल्या जोडीदाराबद्दल बोलणे सहसा टाळावे. बोलण्याच्या ओघात बऱ्याचदा आपण काही अशा गोष्टी बोलून जातो ज्या शक्यतो बोलण्याची गरज नसते आणि अशा गोष्टी इतरांना तुमच्या नात्याबद्दल अंदाज लावण्याची संधी देतात. कधीकधी समोरून प्रश्नांचा इतका भडीमार होतो की तुम्ही निरुत्तर होता. शक्यतो बाहेर कोणासोबतही बोलताना आपले खाजगी आयुष्य जास्त उघड करू नये.

अनफॉलो करणे

हा सुद्धा सध्याच्या सोशल मीडिया आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. पण ज्यांची लग्न झालेली असतात त्यांच्याकडून ही गोष्ट फार होत नाही कारण जरी तिथे अनफॉलो केले तरी घरी येऊन एकमेकांसमोरच वावरायचे असते. पण ज्यांची लग्न ठरलेली असतात वा ओपन रिलेशनशिपमध्ये असतात त्यांनी कितीही भांडण झाले तरी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो करू नये. कारण काही लोक आसपास अशी असतात की ज्यांना तुमच्या आयुष्यात अतिशय रस असतो आणि जर का त्यांच्या हे नजरेस पडले तर त्याचे भांडवल करण्याची संधी असे लोक सोडत नाहीत.

लोकांमध्ये आदर्श कपल्स सारखेच वावरावे

जरी कितीही भांडणे, वाद झाले आणि त्यानंतर कुठे बाहेर जायचे असेल तर दोघांनीही जणू काही घडलेच नाही अशा अविर्भावात लोकांमध्ये वागावे. यामुळे समोरच्याला सुद्धा सगळं काही ठीक असल्याचं कळतं. पण जेव्हा लोकांना उघडपणे वाद दिसू लागतात तेव्हा ते त्यांच्या मनातील शंका तुम्हाला विचारणारच आणि मग पुढे त्यातून अफवा बनायला वेळ लागत नाहोत. म्हणून शक्य तितके आनंदी आणि खुश राहावे आणि आपले नाते सांभाळावे.