वास्तुशास्त्रानुसार अशी असावी बेडरूम

घर बांधत असताना सर्वात महत्त्वाची बेडरूम होय. कारण आपण दिवसभराचा आलेला थकवा आलेला कंटाळा आपण आपल्या बेडरूम मध्ये घालवतो.

    वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्यामुळे कितीतरी अडचणींपासून आपली सुटका होत असते. बांधकाम करत असताना योग्य पद्धतीने घराची रचना केली नसल्यास म्हणजे कोणतीही खोली कोणत्याही ठिकाणी बांधली गेल्यास त्याचे खुप वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात.

    म्हणजे यामुळे घरांमध्ये वारंवार भांडण तंटे होणे, घरातील व्यक्‍ती वारंवार आजारी पडणे, आर्थिक अडचणी, मुला-मुलींच्या लग्नास विलंब लागणे अशा अनेक अडचणींना आपल्याला तोंड द्‌यावे लागते. म्हणूनच घर बांधत असताना वास्तुशास्त्राचा विचार करून घराची रचना करावी. घर बांधत असताना सर्वात महत्त्वाची बेडरूम होय. कारण आपण दिवसभराचा आलेला थकवा आलेला कंटाळा आपण आपल्या बेडरूम मध्ये घालवतो.

    आपल्याला जर शांतपणे झोप लागली तर दुसऱ्या दिवशी आपल्याल आनंदी व प्रसन्न वाटते प्रसन्न मनाने आपण आपल्या कामाला लागतो त्यामुळे आपली सर्व कामे यशस्वी होतात. म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपल्या बेडरुम कसे असावे याबद्दल माहिती घेणार आहोत आपले बेडरूम कोणत्या दिशेला असावे कोणत्या दिशेला नसावे याबद्दल माहिती घेणार आहोत. आपल्या घराची वास्तु जर मोठी असेल तर उत्तरेकडील बाजू वायव्य भाग सोडून बैठक खोलीच्या शेजारी बेडरूम असणे अत्यंत चांगले आहे देवघर असलेल्या खोलीत बेडरूम कधीही नसावे. उत्तरेकडे बेडरूम असल्यामुळे सूर्याची किरणे घरामध्ये येतात. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या सूर्यनारायणाचे दर्शन होते. उत्तरेकडील बेडरूममध्ये दक्षिणेला किंवा पूर्वेला डोके करून झोपल्यास झोप चांगली लागते.

    उत्तर व पश्‍चिमेला डोके करून झोपल्यास थोड्या प्रमाणात स्वप्ने पडतात व धनलाभ होतो पश्‍चिमेकडील नेक्रत्य कोपऱ्यामध्ये घरातील कर्त्या पुरुषाचे बेडरूम असायला हवे. वास्तूमध्ये अनेक मजले असल्यास सर्वात वरच्या मजल्यावर पश्‍चिमेकडील नेकूत्य कोपऱ्यामध्ये बेडरूम करावी. ही बेडरूम मोठ्या मुलांसाठी देखील आपण करू शकतो. पण लहान मुलासाठी किंवा मुलीसाठी यामध्ये बेडरूम करू नये. त्यामुळे घरात विनाकारण आंडण होण्यास सुरुवात होते दक्षिणेकडे देखील बेडरूम असायला काही हरकत नाही पण चुकूनही दक्षिणेकडे पाय करून झोपू नये.

    दक्षिण व आग्नेय कोपऱ्यामध्ये कोणतेही दरवाजे नसावेत एखादी खिडकी असल्री तरी चालेल मात्र दरवाजे नसावेत पश्‍चिम दिशेची बेडरूम मुलाकरता योग्य आहे. पूर्व दिशेच्या बेडरूममध्ये अविवाहित मुला-मुलींना किंवा पाहुण्यांना झोपण्यासाठी ही खोली अत्यंत चांगली आहे परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये नवीन जोडप्याला या खोलीमध्ये झोपण्यास जागा देऊ नये. मित्रांनो या माहितीचा अनेक जणांनी योग्य तो उपयोग करून आपल्या घराची बेडरूमचे व्यवस्थित रचना करून घेतले आहेत.