lakshmi and vishnu

चातुर्मासामध्ये (Chaturmas)भगवान विष्णू(Lord Vishnu) हे योगनिद्रेसाठी पाताळात जातात. या वेळी भगवान विष्णूचे साधक संयम आणि नियमांनी जप, तपश्चर्या, दान इत्यादी करुन भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी उपाय करतात.

  देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूच्या पूजेसाठी शुभ मानल्या जाणार्‍या चातुर्मास देवशयनी एकादशी (आषाढी एकादशी)(Ashadhi Ekadashi) २० जुलै २०२१ ते देवोत्थान एकादशी (कार्तिकी एकादशी)१४ नोव्हेंबर २०२१ पर्यंत असेल. असे मानले जाते की चातुर्मासामध्ये (Chaturmas)भगवान विष्णू(Lord Vishnu) हे योगनिद्रेसाठी पाताळात जातात. या वेळी भगवान विष्णूचे साधक संयम आणि नियमांनी जप, तपश्चर्या, दान इत्यादी करुन भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी उपाय करतात. हिंदू धर्माबरोबरच जैन आणि बौद्ध धर्मातही चातुर्मासाचं विशेष महत्त्व आहे. चातुर्मासाविषयीची माहिती आपण आज जाणून घेऊ.

  चातुर्मासाची कथा
  असे म्हटले जाते की, एकदा राक्षसांचा राजा विरोचनाचा मुलाचा मुलगा बलीने अश्वमेध यज्ञ करुन बरेच पुण्य प्राप्त केले. यामुळे सर्व राक्षस देवतांपेक्षा उच्च श्रेणीत पोहोचले आणि त्यांनी देवतांचा राजा इंद्र याच्याकडून त्याचे सिंहासन काढून घेतले. यानंतर सर्व देवता मदत मागण्यासाठी भगवान विष्णूच्या आश्रयाला गेले. मग भगवान विष्णूने देवतांच्या रक्षणासाठी वामन अवतार घेतला आणि बलिच्या डोक्यावर पाय ठेवून तीन पावलांमध्ये पृथ्वी, आकाश आणि पाताळ मोजून बलीला आश्रयहीन केले. पण, त्या बदल्यात बलीला पाताळाचे राज्य दिले आणि वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा बलीने त्याला विनंती केली की वर्षातून एकदा त्यांनी माता लक्ष्मीसोबत पाताळलोकात निवास करावा. भगवान विष्णूने तथास्तु म्हणून त्यांची इच्छा पूर्ण केली. तेव्हापासून भगवान विष्णू हे चार महिने पाताळलोकात योग निद्रेत देवी लक्ष्मीबरोबर राहतात.

  चातुर्मासात काय कराल ?

  • आयुर्वेदानुसार चातुर्मासमध्ये साधे, ताजे आणि पचण्याजोगे अन्न घ्यावे.
  • मांसाहारी, पालेभाज्या आणि दहीचे सेवन चातुर्मासमध्ये टाळावे.
  •  चातुर्मासात ब्रह्मचर्य पूर्णपणे पाळले पाहिजे, असेही काहीजण म्हणतात.
  • चातुर्मास कालावधीमध्ये दिवसा झोपू नये.
  • शरीर, मन आणि आरोग्यासाठी सर्व नियमांचे पालन करुन ध्यान, जप करावा आणि चवेचा त्याग केला पाहिजे.

  काय आहे चातुर्मासाचे महत्त्व ?
  चातुर्मास अर्थात चार महिन्यांचा हा काळ विशेषत: देवाच्या साधनेसाठी अध्यात्मिक मानला जातो. या चार महिन्यात भगवान श्री विष्णूची उपासना करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की, भगवान विष्णू सर्वव्यापी आहेत आणि ते संपूर्ण सृष्टीचे पालनकर्ता आहेत. म्हणूनच, या पवित्र महिन्यात देवी लक्ष्मीसोबत शेषनागवर झोपलेल्या विष्णूच्या मूर्तीची पूजा केली जाते. या चार महिन्यांत जो कोणी सर्व नियम पाळत भगवान विष्णूची उपासना करतो त्याला सुख आणि समृद्धी इत्यादींचा लाभ मिळतो आणि अखेर त्याला मोक्ष प्राप्त होतो.