dev deepawali pm modi visit kashi varanasi ganga ghat aarti 15 lakhs diyas vb

गंगेच्या पाण्याने अंघोळ(Bath with Ganga Water)केल्यास अनेक रोगांचा नायनाट होतो, तसेच वास्तुदोषही दूर होतात.

  गंगा(Ganga) ही शुद्ध स्वरूपिणी आहे. गंगेच्या पाण्यामुळे सर्व पापांचा नाश तर होतोच पण त्या मागचे वैज्ञानिक कारण असे आहे की गंगेच्या पाण्यात औषधी गुणधर्म आढळते. गंगेच्या पाण्याने अंघोळ(Bath with Ganga Water)केल्यास अनेक रोगांचा नायनाट होतो, तसेच वास्तुदोषही दूर होतात.

  वास्तूदोष होतो दूर
  आपल्या घरात वास्तूदोष असल्यास आणि त्याचा आपणास त्रास होत असल्यास घरात नियमानने गंगाजलाने फवारणी करायला हवी. असे केल्यास वास्तू दोषांचा प्रभाव दूर होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो. त्यासाठी नियमाने गंगेच्या पाण्याची फवारणी करावी.

  गृह क्लेश निवारण
  कुटुंबातील सदस्य अडचणीत असल्यास दररोज सकाळी घरात गंगेच्या पाण्याची फवारणी करायला हवी. असे केल्याने घराची नकारात्मकता नाहीशी होते आणि साकारात्मक वातावरणाची निर्मिती होते.

  प्रगतीचे द्वार खुलते
  वास्तू दोषांमुळे घरात समस्या असल्यास पितळेच्या बाटलीत गंगाजल भरून घराच्या ईशान्य दिशेस ठेवावे. आपल्या सर्व समस्यांचा नायनाट होईल. गंगाजलास नेहमी आपल्या पूजेच्या स्थळी आणि स्वयंपाकघराच्या ईशान्य दिशेस ठेवावे. आपल्याला नेहमीच प्रगती आणि यश मिळेल. ज्या घरात गंगाजल ठेवले जातं त्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा प्रसरते आणि आंनद आणि भरभराटी येते.

  व्हा निरोगी
  गंगेच्या पाण्यात चमत्कारी शक्ती आहे. वर्षानुवर्षे बाटलीत ठेवल्यानंतरही गंगेचे पाणी खराब होत नाही. अशी आख्यायिका आहे की जो माणूस दररोज गंगेच्या पाण्याचे सेवन करतो तो निरोगी राहतो आणि दीर्घायुष्य जगतो. ग्रंथामध्ये असे म्हटले आहे की गंगेच्या पाण्यामध्ये बुद्धिमत्ता वाढविण्याची आणि पचन तंत्र बलिष्ठ करण्याचे सामर्थ्य आहे.

  ग्रहदोषांचा नायनाट 
  दर सोमवारी शिवपूजनाच्या दिवशी शिवलिंगावर गंगेच्या पाण्याने अभिषेक केल्यास शंकर प्रसन्न होऊन सर्व दुर्गुणांचा नायनाट होईल तसेच दर शनिवारी एका तांब्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यात जरा थेंबभर गंगाजल टाकून त्या पाण्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण केल्याने शनीच्या दुष्प्रभावांपासून मुक्ती मिळते.