पूजेत वापरला जाणारा कापूर आहे एक वनस्पतीचा प्रकार; जाणून घ्या माहिती

कापुर हा सदाहरित(बारा महिने हिरवा असणारा वृक्ष) वृक्षांपैकी एक आहे आणि संबंध बुंधा त्याचा एकत्र असतो ज्याची सरासरी उंची १२ते१५ मीटर असते (३०ते४० फूट) आणि घेरा ३ ते ४ फुटांचा असतो.

    पूजेमध्ये आवर्जून वापरला जाणारा कापूर ही एक वनस्पती आहे. अनेकांना हे वाचून आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे.  जणू घेऊया कपूर कसा तयार होतो. कच्च कपूर हा डिंकाच्या स्वरूपात असतो, त्यावर प्रक्रियाकरून शुद्ध कापराची निर्मिती करण्यात येते.

    स्वातंत्र्यापूर्वी काळात कापुर प्राय मूलतः आशिया खंडातली वनस्पती आहे जी भारत, जपान, चीन, जावा, सुमात्रा बेटे आणि इंडोनेशिया इथे मुबलक प्रमाणात आढळायची.

    खरे ऐकले आपण भारत हा कापराचा उद्गाता म्हणुन ओळखल्या जातो वैद्यगुरु धन्वंतरी आणि ऋषी चरकांनी सर्वप्रथम कापुर हा औषधींमध्ये वापरला आणि नंतर तो घरोघरी त्याचा वापर सुरु झाला.


    कापुर भारतात का आढळत नाही?

    त्याचे मुख्य कारण आहे परकीय आक्रमणे आणि सोबतच त्यांनी आणलेले शो ची झाडे जशी गुलमोहर आणि निलगिरी

    इंग्रजांना निळ रबर आणि चहासाठी बागायती जमिनी तयार करून घ्यायचे काम या झाडांनी केले. कालांतराने  आपणही ते सुरू केले आणि महाकाय झाडे जशी कापुर वड आणि पिंपळ ह्यांची कत्तल सुरु केली आणि त्यातूनच कापुर नामशेष झाला.

    जापान, सुदान, जावा ,सुमात्रा आणि इंडोनेशिया या देशांनी मात्र कापुर जोपासला आणि आज आपण बघतो तिथले वातावरण आपल्यापेक्षा कित्येक पटीने शुद्ध आहे.

    कापुर ज्याचे वैज्ञानिक नाव cinnamomum camphora असे आहे त्यालाच Camphor Tree, Camphor Laure, Camphortree, Japanese Camphor, Chinese Sassafras tree या नावांनी देखील ओळखल्या जाते.

    कापुर हा सदाहरित(बारा महिने हिरवा असणारा वृक्ष) वृक्षांपैकी एक आहे आणि संबंध बुंधा त्याचा एकत्र असतो ज्याची सरासरी उंची १२ते१५ मीटर असते (३०ते४० फूट) आणि घेरा ३ ते ४ फुटांचा असतो.

    एप्रिल-मे हा त्याच्या हंगाम असतो जेव्हा त्याला फुले लागायला सुरवात होते आणि हिवाळ्यात फलोत्पादन तेसुद्धा कापुराचा आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यात(म्हणजेच ७ वर्षानंतर) सुरु होते.

    कापुरसाठी लागणारी भौगोलिक परिस्थिती

    पाण्याचा व्यवस्थित निचरा होणारी जमीन तसेच थोडायप्रमानात क्षारयुक्त जमीन ही कापुर लागवडीसाठी योग्य जमीन असते. सुरवातीचे काही दिवस कापराची व्यवस्थित निगा घ्यावी लागते नंतर गरज नाही.

    कापुर वृक्षाचे वय हा एक शोधाचा वेगळा भाग आहे त्याचे सरासरी वय जरी मानव इतके असले तरी जगाच्या पाठीवर हजारो वर्षे जुने कापुर झाड सुद्धा आहे त्यातले एक झाड जापान इथं आहे त्याचे वय सध्या १५०० वर्षे आहे ज्याला जपानी लोकांनी the great capmhor of kamo हे नाव सुद्धा दिले आहे.

    कापुर ज्वालाग्राही आहे परंतु त्याला कमीतकमी ४८℃ इतके तापमान लागते पेट घ्यायला आणि कापुरला कमी तापमान सहन होत नाही म्हणजेच उणे ३℃ ते उणे ४℃ मध्ये त्याची लागवड होत नाही.

    उंच आणि दाट फांदी तसेच पानांमुळे कापुर हा सावली देण्यात उत्तम असा वृक्ष आहे.  सदाहरित असल्यामुळे कापुर हा तुळशीच्या खालोखाल ऑक्सिजन देणारा वृक्ष आहे.

    उपयोग 

    आयुर्वेदात कापुराचे भरपूर उपयोग आहेत भरपूर असे प्रसंग आहेत जिथे आपल्याला कापुराचा उल्लेख आढळतो आजच्या आयुष्यातसुद्धा तांबूल बनवताना किंवा तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडवात ह्या कापुराचा उपयोग होतो.

    कापुर हा उत्तम नैसर्गिक वेदनाशामक तसेच भुलीसाठी वापरण्यात येणारा पदार्थ असुन कापुर तुम्हाला तुमच्या बऱ्याच श्वसनाच्या आजारात फायदेशीर आहे.

    त्याचे कारण म्हणजे कापुरातून मिळणारा ऑक्सिजन जर तुमचा श्वास भरून येत असेल अथवा दमा झाला असेल तर कापुर हा संजीवनी आहे त्यासोबतच कापुराचा उल्लेख ९ मृतसंजीवनी मध्ये केल्या जातो जे माणसाचे आयुष्य वाचवायचे साहस ठेवतात.

    असा हा कापुर सर्दी खोकला दमा विषप्रयोग निद्रानाश वेदनाशामक आणि अश्या बऱ्याच गोष्टींमध्ये उपयोगी आहे आणि सध्या त्याचा उपयोग अरोमा थेरपी मध्ये सुद्धा सुरु केला आहे. कापुराचे खोड मजबुत तसेच टिकाऊ असते त्यामुळे कापुराच्या लाकडाचा उपयोग घर बनवण्यासाठीसुद्धा होतो.