१४ डिसेंबरला आहे सूर्यग्रहण; जाणून घ्या काय होणार याचा परिणाम

सोमवारी लागणारे सूर्यग्रहण हे वर्षातले शेवटचे ग्रहण असणार आहे. हे ग्रहण संध्याकाळी ७ वाजतानंतर लागणार असल्याने ते भारतात दिसणार नाही

१४ डिसेंबरला (December 14) सोमवारी होणारे खंडग्रास सूर्यग्रहण(solar eclipse) हे या वर्षातले अखेरचे सूर्यग्रहण असणार आहे. जोतिष्य शास्त्रानुसार हे सूर्यग्रहण दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिका, प्रशांत महासागर अटलांटिक आणि हिंद महासागर याशिवाय अंटार्टिकामध्ये  पूर्णपणे दिसणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे ग्रहण भारतात दिसणार नाही. भारतीय वेळेनुसार ग्रहण संध्याकाळी ७ वाजून ३ मिनिटांनी सुरु होणार असून रात्री १२ वाजून २३ मिनिटांनी समाप्त होईल. सूर्यग्रहणाच्या अवधी जवळपास ५ तास असेल

भारतात काय होणार परिणाम

सोमवारी लागणारे सूर्यग्रहण हे वर्षातले शेवटचे ग्रहण असणार आहे. हे ग्रहण संध्याकाळी ७ वाजतानंतर लागणार असल्याने ते भारतात दिसणार नाही, त्यामुळे ग्रहणकाळात भारतात याचा कुठलाही परिणाम पाहायला मिळणार नाही.

ग्रहणकाळात गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी

ग्रहण काळात गर्भवती महिलांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. ग्रहणाची छाया गर्भावर पडणे अशुभ मानले जाते. ग्रहण काळात गर्भवती महिलांनी सुई, कैची, चाकू इत्यादींचा वापर टाळावा.

ग्रहणकाळात अवश्य करा ‘हे’ काम

सूर्यग्रहण लागण्याआधी दान करावयाच्या वस्तू काढून ठेवाव्यात. ग्रहण संपल्यानंतर या वस्तूंचे दान करावे. ग्रहणकाळात कुठलेच पूजा कार्य करू नये. तुळशीमध्ये नाकारात्मकता रोखण्याची शक्ती असते, त्यामुळे ग्रहणाआधी अन्न धान्यावर तुळशीपत्र  अवश्य टाकावे. ग्रहणकाळात पूजापाठ वर्जित असले तरी या काळात मंत्र पठण करता येते.