Decorate Mahadev with 15 lakh notes

महादेवांच्या सजावटीसाठी भक्तांनी तब्बल 15 लाख रुपयांच्या नोटा अर्पण केल्या आहेत. महादेवाला 50, 100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा एकत्रित करून श्रृंगार करण्यात आला होता. राठौर संघाच्या कमिटीने 15 लाख नोटा भगवान महादेवाला अर्पण करण्यात आल्या. भोपाळच्या गिन्नौरी संकटहारण महादेव मंदिरात 30 लोकांनी मिळून इतकी मोठी रक्कम जमा केली होती.

    भोपाळ : महादेवांच्या सजावटीसाठी भक्तांनी तब्बल 15 लाख रुपयांच्या नोटा अर्पण केल्या आहेत. महादेवाला 50, 100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा एकत्रित करून श्रृंगार करण्यात आला होता. राठौर संघाच्या कमिटीने 15 लाख नोटा भगवान महादेवाला अर्पण करण्यात आल्या. भोपाळच्या गिन्नौरी संकटहारण महादेव मंदिरात 30 लोकांनी मिळून इतकी मोठी रक्कम जमा केली होती.

    कोणी 25 हजार, कोणी 35 हजार तर कोणी 50 हजार रुपये देऊन रक्कम जमा केली. महादेवाच्या अनोख्या सजावटीसाठी 4 ते 5 तासांचा कालवधी लागला. तसेच महादेवाला अर्पण करण्यात आलेली ही 15 लाखांची रक्कम समाजकार्यासाठी खर्च केली जाईल, असेही सांगण्यात आले.