footwear

वास्तूकडे(Vastu) लक्ष न दिल्यास आर्थिक समस्या, आरोग्यविषयक समस्या, कौटुंबिक कलह अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे कोणत्या ठिकाणी चपला घालून जाणे अशुभ(Bad) आहे, हे जाणून घ्या.

  लोक जाणतेपणी किंवा अजाणतेपणी अशा चुका करतात ज्यामुळे वास्तूदोष निर्माण होतो. असे मानले जाते की सुखी सांसारिक जीवनासाठी योग्य वास्तू असणे आवश्यक आहे. वास्तूकडे(Vastu) लक्ष न दिल्यास आर्थिक समस्या, आरोग्यविषयक समस्या, कौटुंबिक कलह अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे कोणत्या ठिकाणी चपला घालून जाणे अशुभ(Bad) आहे, हे जाणून घ्या.

  • वास्तूशास्त्रानुसार पवित्र नदीच्या जवळ चप्पल घालून जाऊ नये. पवित्र नदीमध्ये स्नान करण्याआधी चपला आणि चामड्याच्या वस्तू काढून ठेवाव्यात. असे केल्याने घरात सुख-शांती नांदते.
  • असं म्हणतात की, स्वयंपाकघरामध्ये कधीही चप्पल घालून जाऊ नये. असे केल्याने अन्नपूर्णा नाराज होते.लोकांना कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. आजकाल या नियमाचे कुणीही पालन करताना दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या समस्या वाढतात.

   फास्ट फूडची क्रेज कमी करण्यासाठी आता पालकांनीच पौष्टिक आहाराचा आग्रह धरायला हवा तरच येणारी पिढी सशक्त असेल, असे वाटते का?

   View Results

   Loading ... Loading ...
  • ज्योतिषशास्त्रानुसार तिजोरीमध्ये काही ठेवायला जात असाल तर चप्पल काढून ठेवा. तिजोरीजवळ चप्पल घालून वावरल्याने लक्ष्मी नाराज होते असे म्हटले जाते. परिणामी आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो.लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहावी, असे तुम्हाला वाटत असेल तर या नियमाचे पालन नक्की करा.
  • धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात मंदिराला देवाचे घर म्हटले जाते. त्यामुळे मंदिरात चप्पल घालून जाऊ नका. त्यामुळे देवी-देवता नाराज होतात.
  • असेही म्हटले जाते की धान्य साठवलेल्या खोलीतही चपला घालू नये. घरात अन्नाची कमतरता भासू नये म्हणून हा नियम पाळायला हवा.