तुमचेही आजी आजोबा उलटी चप्पल पाहून रागवायचे का?; हे आहे कारण

चप्पल हा आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे.चप्पल असो वा बूट या दोघांबद्दल ज्योतिष शास्त्र व वतुशास्त्रामध्ये  काही महत्त्वाचे नियम सांगितले गेले आहेत.

    चपला किंवा जोडे उलटे ठेवले म्हणून अनेकांना त्यांच्या आजी आजोबांनी टोकले किंवा रागावले असेल. त्यावेळी रागावलेल्या आजी आजोबांना असे करण्यामागचे कारण विचारण्याची हिंमत कोणी केली नसेल. त्यामुळेच आज असे करण्यामागचे शास्त्रीय कारण आपण जाणून घेणार आहोत.

    चप्पल हा आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे.चप्पल असो वा बूट या दोघांबद्दल ज्योतिष शास्त्र व वतुशास्त्रामध्ये  काही महत्त्वाचे नियम सांगितले गेले आहेत. बरेचदा असे होते की, आपण आपल्या घरासमोर चप्पल काढतो किंवा आपल्याकडून चप्पल उलटी होते. अगदी अनपेक्षितपणे नकळत या गोष्टी घडतात. मात्र असे पालथे पडलेले बूट व पालथे पडलेली चप्पल सरळ करून ठेवावेत कारण तुमची चप्पल वारंवार उलटी पडत असेल तर त्यामुळे आपल्या घरामध्ये विनाकारण वाद निर्माण होतात भांडणे चालू होतात. बऱ्याच वेळा आपली चप्पल तुटते व खराब होते त्यावेळी आपण म्हणतो की चप्पल दुरुस्त करून घेऊ म्हणून ती चप्पल आपण घरात तशीच ठेवतो. अगदी महिनो-महिने ती चप्पल घरात अशीच पडून राहते. असे तुटलेले चप्पल व बूट आपल्या घरामध्ये अशांती निर्माण करतात.

    बऱ्याच जणांना चप्पल दारासमोर काढण्याची सवय असते. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. याशिवाय ते पाहणाऱ्याच्या मनातही नकारात्मक भावना निर्माण करते.