तृतीयपंथीयांनाही येते का मासिक पाळी?; जाणून घ्या सत्य

शारीरिक लिंग एक आहे व त्याचा लिंगभाव विरुद्ध लिंगाचा आहे तर अशांना  ‘ट्रान्सजेंडर’ म्हणतात. ‘ट्रान्सजेंडर’ दोन प्रकारचे असतात.

    ट्रान्सजेंडर म्हणजेच तृतीयपंथी समाजच असा भाग जो अजूनही मोठ्या प्रमाणात अस्वीकृत आहे. त्यांच्याबद्दल अनेक समज, गैरसमज, कुतूहल जनसामान्यांमध्ये पाहायला मिळते. स्त्री आणि पुरुष या दोघांचेही गुण आलेल्या तृतीयपंथीयांना मासिक पाळी येते का? हा प्रश्न अनेकांना कधी ना कधी पडला असेल. आज आपण त्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया.    शारीरिक लिंग एक आहे व त्याचा लिंगभाव विरुद्ध लिंगाचा आहे तर अशांना  ‘ट्रान्सजेंडर’ म्हणतात. ‘ट्रान्सजेंडर’ दोन प्रकारचे असतात.

    १. ट्रान्सजेंडर पुरुष: हे शारीरिकदृष्ट्या स्त्री असतात म्हणजे त्यांना योनी, गर्भाशय, स्त्रीबीजांड, स्त्रीबीजवाहिन्या हे सर्व अवयव असतात पण मानसिकदृष्ट्या त्यांचे भाव पुरुषांसारखे असतात. अशांना स्त्रीचे शरीर असल्यामुळे नैसर्गिकरित्या मासिक पाळी येते. पण जर त्यांनी लिंगबदल शस्त्रक्रिया (SRS: Sex Reassignment Surgery) केली तर मासिक पाळी येणे थांबते. अथवा जर त्यांनी गोळ्या/ इंजेक्शनमार्फत काही संप्रेरक घेतले तर मासिक पाळी येण्याची शक्यता कमी होते पण मासिक पाळीशी संबंधित लक्षणे येऊ शकतात.

    २. ट्रान्सजेंडर स्त्री: हे शारीरिकदृष्ट्या पुरुष असतात म्हणजे त्यांना लिंग व वृषण असतात पण मानसिकदृष्ट्या त्यांचे भाव स्त्री सारखे असतात. अशांना नैसर्गिकरित्या मासिक पाळी येणे शक्य नसते. लिंगबदल शस्त्रक्रियाचा माध्यमातून सुद्धा मासिक पाळी येणे शक्य नाही कारण सध्या तरी मासिक पाळी येण्याकरिता ट्रान्सजेंडर स्त्रियांमध्ये गर्भाशय प्रत्यारोपण होत नाही.

    (साभार- ऐश्वर्या सावंत)