Don't do 'these' things by mistake in a lunar eclipse

2021 चे पहिले चंद्रग्रहण 26 मे रोजी होईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 17 मिनिटावर याची सुरुवात होईल आणि संध्याकाळी 7 वाजून 19 मिनिटापर्यंत राहील. ग्रहण प्रथम ग्रहण 14:18 वाजता सुरू होईल आणि पूर्ण ग्रहण 16:43 वाजता सुरू होईल. चंद्रग्रहण जास्तीत जास्त 16:48 असेल आणि ग्रहण 16:54 वाजता समाप्त होईल.

  मुंबई :  2021 चे पहिले चंद्रग्रहण 26 मे रोजी होईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 17 मिनिटावर याची सुरुवात होईल आणि संध्याकाळी 7 वाजून 19 मिनिटापर्यंत राहील. ग्रहण प्रथम ग्रहण 14:18 वाजता सुरू होईल आणि पूर्ण ग्रहण 16:43 वाजता सुरू होईल. चंद्रग्रहण जास्तीत जास्त 16:48 असेल आणि ग्रहण 16:54 वाजता समाप्त होईल.

  जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णत: वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. चंद्रग्रहण साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास दिसते. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्रग्रहण होते.

  चंद्रग्रहण दरम्यान काय करू नये

  • प्रत्यक्ष ग्रहणावेळी कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करण्यास मनाई आहे.
  • चंद्र ग्रहण दरम्यान देवांच्या मूर्तीला हात लावू नये. या दरम्यान सूतक असल्यामुळे मंदिराचे दार बंद ठेवावे.
  • ग्रहणावेळी भोजन शिजवू नये अर्थात स्वयंपाक करु नये. अशाने ग्रहांच्या परिवर्तन तसंच आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
  • ग्रहण दरम्यान वादविवाद टाळण्यासाठी असे म्हटले जाते की या काळात पती-पत्नीने संयम ठेवला पाहिजे.
  • या दरम्यान गर्भवती स्त्रियांनी सर्वात अधिक काळजी घेतली पाहिजे. ग्रहणाचा विपरित प्रभाव गर्भातील शिशुवर होऊ शकतो म्हणून अशात गर्भवती स्त्रियांनी स्वत:जवळ एक नारळ ठेवावं.
  • ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असते. या दरम्यान खाद्य पदार्थ पूर्णपणे विषारी होऊन जातात
  • ग्रहण दरम्यान कुठलेही शुभ किंवा नवीन काम सुरू करणे टाळावे.