इतरांच्या ‘या’ वस्तू चुकूनही वापरू नका; जाणून घ्या कारण

बऱ्याचजणांना  इतरांचे वापरलेले कपडे घालण्याची सवय असते. भावंडे अथवा मित्र-मैत्रीणींचे कपडे वापरण्यात काहीच चुकीचे नाही असे अनेकांना वाटते...

    प्रत्येक वास्तूमध्ये ऊर्जा असते. आपण वापरात असलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये आपल्या ऊर्जेचा अंश असतो, म्हणूनच साधू संतांच्या पादुका, वस्त्र आणि त्यांच्या वापरलेल्या इतर वस्तूंना पवित्र आणि पूजनीय मानतात. प्रत्येकजण वापरात असलेल्या त्यांच्या त्यांच्या वस्तूंमध्ये ऊर्जेचा अंश असतो.

    समजा तुम्ही एखाद्या मंदीरात गेला आणि तिथे तुमच्या चपला चोरी झाल्या तर रागाने इतरांच्या चपला घालून घरी जावू नका. कारण इतरांच्या चपलांमधील निगेटिव्ह ऊर्जा तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. असं म्हणतात की चपला चोरीला जाणं म्हणजे दारिद्र कमी होणं. त्यामुळे इतरांचे दारिद्र घरी घेऊन येवू नका. त्याऐवजी नवीन चपला घेणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकेल.

    घड्याळ – हातामध्ये वापरण्याचे  घड्याळ देखील कधीच कोणी वापरलेले घेऊ नये कारण त्यामध्ये देखील वापरण्याऱ्या व्यक्तीची निगेटिव्ह अॅनर्जी असते. ज्यामुळे तुमचे अतोनात नुकसान होऊ शकतं. असं वापरलेलं घड्याळ वापरल्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान आणि अपयशाचा सामना करावा लागू शकतो.

    रुमाल – अनेकदा घरातील मोठी माणसे तुम्हाला इतरांचा रूमाल वापरू नका. मात्र त्यामागची कारणे माहीत नसल्यामुळे आपण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र इतरांचा वापरेला रूमाल वापरल्यामुळे घरात क्लेष निर्माण होऊ शकतात. शिवाय वैज्ञानिकदृष्टा बघायला गेलं तर इतरांच्या रूमालामधील घाण अथवा बॅक्टेरियामुळे तुम्हाला इनफेक्शन होऊ शकतं. त्यामुळे इतरांचे वापरलेले रूमाल वापरणं धोक्याचं असू शकतं.

     

    गादी अथवा बेड – प्रत्येकाने आपल्या गादी अथवा बिछान्यामध्ये झोपणं हेच हितकारक असू शकतं. इतरांच्या बेडवर झोपण्यामुळे वास्तूदोष होऊ शकतो. इतरांच्या बेडवर झोपल्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.

    कपडे – बऱ्याचजणांना  इतरांचे वापरलेले कपडे घालण्याची सवय असते. भावंडे अथवा मित्र-मैत्रीणींचे कपडे वापरण्यात काहीच चुकीचे नाही असे अनेकांना वाटते. अनेकजण वापरलेले कपडे इतरांना दान करतात.  मात्र असे इतरांचे कपडे घालणं धोक्याचं ठरू शकतं. कारण असं केल्यामुळे त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये येते.

    पेन – अनेकांना पेन विसरण्याची सवय असते. जेव्हा अशा  लोकांना काहीतरी लिहावं लागतं तेव्हा पटकन इतरांचं पेन ते वापरतात मात्र काम झाल्यावर अशी माणसं ते पेन आपल्याच खिषात टाकून निघून जातात. एकतर असं वागणं हे मुळातच चुकीच आहे. शिवाय याचे चुकीचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. कारण असे केल्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. यासाठी कोणाचेही पेन वापरू नका आणि कोणालाही तुमचे पेन वापरण्यास देऊ नका.