कमाईपेक्षा खर्च अधिक होतोय?; मग हा एक उपाय तुमचे नशीब बदलेल!

वास्तुदोष निवारण्यासाठी सुद्धा तुरटीचा अनेकदा उपयोग केला जातो त्याचबरोबर या तुरटीचा उपयोग करून धनप्राप्तीसाठी सुद्धा अनेक तोटके केले जातात त्यापैकी एक प्रयोग आज आपण जाणून घेणार आहोत.

    आतापर्यंत आपण अनेक जणांनी तुरटीचे अनेक फायदे जाणून घेतलेले असेल. गडूळ पाण्याला स्वच्छ करण्याचे कार्य करत असते असे आपण ऐकले असेल किंवा पाहिले सुद्धा असेल त्याचबरोबर तुरटी मध्ये अनेक औषधी गुणधर्म सुद्धा आहेत. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये तुरटीचे अनेक धर्म सांगितले गेले आहेत. त्याचबरोबर तंत्र-मंत्र शास्त्रांमध्ये सुद्धा तुरटीचे असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत.

    वास्तुदोष निवारण्यासाठीसुद्धा तुरटीचा अनेकदा उपयोग केला जातो त्याचबरोबर या तुरटीचा उपयोग करून धनप्राप्तीसाठीसुद्धा अनेक तोटके केले जातात त्यापैकी एक प्रयोग आज आपण जाणून घेणार आहोत. जर आपल्या उद्योग धंदा, व्यवसाय व नोकरीमध्ये बरकत होत नसेल तसेच आपल्या घरामध्ये व्यक्तिगत वाद निर्माण होत असेल तर या सगळ्या गोष्टींमुळे घरातील वातावरण नेहमी तणावपूर्ण राहत असेल तर किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर अंथरुणाला खिळुन असेल उपचार केले तरी त्या उपचारांचा काही फरक पडत नसेल तरअशावेळी तुम्ही हा उपाय जरूर करा.

    हा उपाय केल्याने तुम्हाला लगेच चांगले परिणाम जाणवू लागतील तसेच जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणावर तयार झालेले आहे व आपल्या घरात वारंवार तंटा ,भांडण, क्लेश होत आहे असे जाणवत असेल तर हा उपाय अवश्य करा. हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता निर्माण होईल. तुरटी वातावरणामध्ये सकारात्मक ताण निर्माण करते आणि जेथे सकारात्मकता असते तेथे प्रत्येक कार्यांमध्ये यश मिळत असते, असा अनेकांना अनुभव मिळतो.

    हा उपाय अतिशय सोपा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या घरात तुरटी ठेवायची आहे. एका काचेच्या वाटीमध्ये तुरटीचे काही खडे ठेवून तुम्हाला हे आपल्या घरामध्ये ठेवायचे आहे. ही तुरटीची वाटी तुम्ही घरामध्ये स्वयंपाक घर, हॉल , बेडरूम कोणत्याही ठिकाणी ठेवू शकतात. या वाटीमध्ये तुरटी तुमच्या घरातील नकारात्मकता खेचून घेईल आणि आपोआपच तुमच्या घरा मध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.

    (आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही माहिती देण्यात आलेली आहे. अंधश्रद्धा पसरविण्याचा हेतू नाही)