shankar

सौभाग्यासाठी आणि मनाजोगता जोडीदार मिळण्यासाठी(how to get life partner by chanting on mahashivratri) शंकराची भक्ती करणे लाभदायक ठरते. महाशिवरात्रीची(mahashivratri) पूजा (mahashivratri puja)आणि व्रत(mahashivratri vrat) यासोबतच काही विशेष मंत्रांचा(mantra) जप केल्याने भगवान शंकरांची आपल्यावर कायम कृपा राहते. या मंत्रांविषयी जाणून घेऊयात.

  महाशिवरात्रीच्या(mahashivratri) पवित्र सणाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. महाशिवरात्री फक्त देशातच नाही तर विदेशातही साजरी केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान शंकरांची पूजा केल्याने आणि व्रत केल्याने शंकराची कृपा आपल्यावर राहते. सगळ्या पापांपासून मुक्ती मिळते. तसेच आयुष्यातील सगळ्या त्रासांमधून मुक्ती मिळते. याच दिवशी शंकर आणि पार्वती यांचा विवाह पार पडला होता.

  सौभाग्यासाठी आणि मनाजोगता जोडीदार मिळण्यासाठी शंकराची भक्ती करणे लाभदायक ठरते. पूजा (mahashivratri puja)आणि व्रत(vrat) यासोबतच काही विशेष मंत्रांचा जप केल्याने भगवान शंकरांची आपल्यावर कायम कृपा राहते. या मंत्रांविषयी जाणून घेऊयात.

  शंकराला प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात ४ तांदळाचे दाणे आणि फूल टाकून ते शिवलिंगावर वाहावे. त्यानंतर ३ बेलाची पाने अर्पण करावी. त्यानंतर पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करुन पुढील मंत्रांचा जप करावा.

  ऊँ नम: शिवाय ऊँ राहुवे नम: ऊँ नमो वासुदेवाय नम: I
  हिंदू धर्माच्या अभ्यासकांच्या मते या मंत्राचा जप केल्याने सगळ्या इच्छा पूर्ण होतात. आयुष्यातील सगळ्या समस्या दूर होऊन सुख- समृद्धी, शांती आणि समाधान मिळते.

  ऊँ मं शिव स्वरुपाय फट्
  जे लोक शत्रुमुळे त्रस्त आहेत अशा लोकांनी या मंत्राचा जप करावा.

  ऊँ ऐं गे ऐं ऊँ
  परीक्षा आणि नोकरीच्या मुलाखतीपूर्वी या मंत्राचा जप करणे चांगले असते.

  ऊँ ह्रीं ग्लौ अमुकं सम्मोहय सम्मोहय फट्
  असं म्हटलं जात की शिवरात्रीचे व्रत केल्याने आणि शंकराची पूजा केल्याने मनाजोगता जोडीदार मिळतो. या मंत्राचा जप केल्याने तुमचे व्रत अधिक सफळ होते. आयुष्याचा साथीदार चांगला मिळतो.

  ऊँ गं ऐं ऊँ नम: शिवाय ऊँ
  मुलांची एकाग्रता वाढावी तसेच ते शांत राहावेत यासाठी या मंत्राचा जप त्यांच्याकडून करुन घ्यावा.

  ऊँ ह्रौं शिवाय शिवाय फट्
  घरातील ताणतणाव दूर व्हावा आणि सुख, शांती आणि समाधान नांदावे, यासाठी या मंत्राचा जप करावा.