मुलांच्या शैक्षणिक प्रगतिमध्ये अडथळा येतोय?; मग वास्तुशास्त्रानुसार घरात करा ‘हा’ बदल

  मुलांकडून अभ्यास करून घेणं पालकांसाठी मोठी अडचण असते. बर्‍याच वेळा मुलं व्यवस्थित अभ्यास करत नसतील तर, पालकांचं टेन्शन आणखीन वाढतं. याला वास्तुमधील दोष हे देखील एक कारण असू शकतं. आपल्या मुलांचे मन अभ्यासात केंद्रित होत नसेल एकाग्रतेने अभ्यास करता येत नसेल तर, हे वास्तु दोषांमुळे देखील होऊ शकतं. काही वास्तू टिप्स वापरुन आपण आपल्या मुलांचं शिक्षण आणि भविष्याशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्त होऊ शकता.

  या वास्तू टिप्सने अभ्यासात फायदा

  आपल्या मुलांनी परिश्रमपूर्वक अभ्यास करावा आणि आयुष्यात यश मिळवावं असं वाटत असेल तर वास्तूशास्त्रानुसार त्यांची अभ्यासाची खोली तयार करा. मुलांची अभ्यासाची रूम पूर्व,उत्तर किंवा ईशान्येकडे बनवावी.

  वास्तुशास्त्रानुसार,अभ्यासाची खोली कधीच पश्चिम दिशेला नसावी. मुलाने फक्त पूर्व दिशेकडे तोंड करून अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित राहतं आणि निश्चितच यश प्राप्त होतं.

  वास्तूशास्त्रानुसार विद्यार्थ्यांनी नेहमी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला डोकं करून झोपावं. पश्चिमे दिशेला डोकं करुन झोपण्याने अभ्यासाची इच्छा अधिक वाढते.

  वास्तूचा विचार करता अभ्यासांच्या खोलीत सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असावा. सूर्य नकारात्मक गोष्टी नष्ट करतो आणि सकारात्मक उर्जा प्रसारित करतो असं मानलं जातं. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सकारात्मक उर्जा आवश्यक आहे सूर्यप्रकाश स्टडी रूममध्ये येण्यासाठी सकाळी खोलीच्या खिडक्या खुल्या ठेवा.

  सरस्वती ही विद्येची देवी मानली जाते,म्हणूनच सरस्वती देवीचं चित्र खोलीत ठेवलं पाहिजे. वास्तू नुसार सरस्वतीचा फोटो विद्यार्थी अभ्यास करतेवेळी पाहतील अशा ठिकाणी ठेवा.

  मुलाला अभ्यास आवडत नसेल आणि किंवा अभ्यासाचं नाव घेताच आळस वाढत असेल तर,अभ्याच्या खोलीत हिरवा रंग वापरा. वास्तुशास्त्रानुसार, अभ्यासाच्या खोलीतील भिंतींचा रंग,पडद्यांचा रंग आणि अभ्यासाच्या टेबलाचा रंग हिरवा ठेवावा.

  वास्तुशास्त्राच्यामते,बीम,जॉईंट किंवा पिलर खाली विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसू नये. कारण, त्यामुळे अभ्यासात मन लागत नाही आणि मानसिक तणावही वाढतो.

  वरील माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट द्वारे नक्की कळवा.

  (वरील माहिती धार्मिक मान्यतेनुसार देण्यात आलेली आहे. अंधश्रद्धा पसरविण्याचा कुठलाच नाही)