shanidev

तुम्हालाही शनिदेवांना प्रसन्न (Please shanidev)करायचं असेल तर शनिवारी काही खास गोष्टी आपण जवळ बाळगल्या पाहीजेत. जाणून घेऊयात या गोष्टींबद्दल.

    शनिवार हा शनिदेवाचा(Shanidev) वार मानला जातो. शनिदेवाला कर्म आणि न्यायाचा देव म्हटले जाते. शनिदेव प्रत्येकाच्या कर्मानुसार चांगलं – वाईट फळ देत असतात. शनिदेवांना प्रसन्न करणं अवघड आहे. मात्र एकदा का शनिदेव कुणाला प्रसन्न झाले तर त्याच्या आयुष्यातील सगळ्या समस्या दूर होतात.

    जर तुम्हालाही शनिदेवाला प्रसन्न करायचं असेल तर शनिवारी काही खास गोष्टी आपण जवळ बाळगल्या पाहीजेत. जाणून घेऊयात या गोष्टींबद्दल.

    • असे मानले जाते की शनिवारी तिळाचे काही दाणे खिशात ठेवल्याने शनिदेव प्रसन्न होतो. असे केल्याने भक्तांची संपत्तीविषयक समस्या दूर होते. तुम्हालाही शनिदेवाला खूश करायंच असेल तर शनिवारी तिळ खिशात नक्की ठेवा.
    • असेही म्हटले जाते की, शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी काळे कपडे घातलेले चांगले असते. शनिदेवाला काळा आणि निळा रंग आवडतो. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी पर्समध्ये निळ्या किंवा काळ्या रंगाचे कापड ठेवा.
    • ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवारी उडद डाळीचे दान करणे शुभ मानले जाते. उडद डाळीचे काही दाणे आपल्या खिशामध्ये ठेवल्याने दु:ख आणि दारिद्र्य दूर होते.तसेच शनिवारी कुत्र्याला चपाती खाऊ घातल्याने शनिदेव प्रसन्न होतात.