लग्न ठरत नसेल तर करा ‘हा’ सोपा उपाय

अविवाहित लोकांना या गोष्टीकडे लक्ष ठेवायला पाहिजे की लग्नाची बोलणी करण्यासाठी आलेल्या लोकांना अशाप्रकारे बसवायला पाहिजे की त्यांचे तोंड घरातल्या आतल्या बाजूस असायला हवी.

    आज- काल मनासारखा जोडीदार मिळण्यास अनेक समस्या येतात. बऱ्याच वेळा लग्नाचं वय निघून जात. तरीही विवाह जमत नाहीत. या गोष्टीची सर्वाधिक चिंता मुला-मुलींच्या आई-वडिलांना असते.

    धार्मिक आणि जोतिष्यशास्त्राच्या मान्यतेनुसार यावर काही उपाय सुचविण्यात आलेले आहेत. जाणून घेऊया ते उपाय काय आहे.

    दर गुरुवारी पाण्यामध्ये एक चमचा हळद किंवा शक्‍य झाल्यास केशर घालून आंघोळ करावी. तसेच गुरुवारी गाईला पीठ खायला घालून त्यात थोडी हळद, गूळ आणि भिजलेला चना खायला दयावी यामुळे तुमचा लवकर विवाह होईल. वास्तु आणि आणि ज्योतिषशास्त्रानुसार अविवाहित मुला-मुलींनी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे टाळायला पाहिजे. याचे मुख्य कारण आहे की काळा रंग शनी, राहू आणि केतू हे तीन ग्रह प्रतिनिधित्व करतात.

    जे विवाहास बाधक असतात. तुम्ही प्रेम विवाह करत असाल किंवा पारंपरिक पद्धतीने विवाह करत असाल तरी या दोन्ही स्थितीत या गोष्टीकडे लक्ष ठेवायला पाहिजे. अविवाहित मुल-मुली घरापासून दूर राहून नोकरी किंवा शिक्षण घेत   असतात. जास्त करून रूम शेअर करतात अर्थात भाड्याने घर घेऊन मित्रांसोबत राहतात. जर तुम्ही या प्रकारे राहत असाल तर तुमच्या लग्नात येणाऱ्या अडचणीना दूर करण्यासाठी आणि मनाप्रमाणे जोडीदार मिळवण्यासाठी आपला बेड दाराजवळ लावायला पाहिजे.

    अविवाहित लोकांना या गोष्टीकडे लक्ष ठेवायला पाहिजे की लग्नाची बोलणी करण्यासाठी आलेल्या लोकांना अशाप्रकारे बसवायला पाहिजे की त्यांचे तोंड घरातल्या आतल्या बाजूस असायला हवी. ज्यांना आपल्या लग्न ठरविताना अडचणी येत असतील त्यांनी या गोष्टींकडे लक्ष द्यायला ह्वे. लग्न करण्यास इच्छुक असलेल्या मुला-मुलींनी झोपताना दक्षिणेस डोकं आणि उत्तरेकडे पाय करून झोपावे. मनाप्रमाणे जोडीदार आणि लवकर लग्न जमण्यासाठी तरुणांना अशा खोलीत झोपायला हवे तेथे एका पेक्षा जास्त दारं असतील.

    विवाहासाठी मुलींना दाखवण्याच्या आदल्या दिवशी किंवा शनिवारी तुरटी ओवाळून विस्तवावर टाकावी. असे तीन शनिवार करावे याने दृष्ट नजरेने जर विवाहास अडथळे येत असतील तर ते नाहीसे होतात व विवाह चांगल्या ठिकाणी जमेल. मंगळ दोषामुळे विवाह जमण्यास अडथळा येत असल्यास मंगल चंडिका स्तोत्र नित्य पठण करावे. उमा महेश स्तोत्र , पार्वती स्तुती अविवाहित मुर्लीनी जरूर करावी. अविवाहित मुला-मुलींनी त्रिपुरारी पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे. विवाह इच्छुक मुलींनी शुक्रवारी देवीला फूल किंवा गजरा अर्पण करावा. असे पाच शुक्रवार न चुकता करावे.

    (धार्मिक मान्यतेनुसार ही माहिती देण्यात आलेली आहे. अंधश्रद्धा पसरविण्याचा होंतही हेतू नाही.)