भारतातल्या ‘या’ ठिकाणी नवरदेव-नवरीला सर्वांसोमर बदलवावे लागतात कपडे!; अशी आहे प्रथा

लग्नामध्ये सर्वांसमोर वधूला वराचे कपडे घालावे लागतात आणि वराला मुलीचा वेष लावून साडी किंवा लेहेंगा परिधान करावा लागतो. ही परंपरा विचित्र असू शकते पण गन्नमनीचे लोक पूर्ण उत्साहाने याचे पालन करत आहेत.

  हिंदू धर्मात लग्न सोहळा सोळा  संस्कारांपैकी एक मानले जाते. भारतीय संस्कृतीत लग्न म्हणजे दोन आत्मा आणि दोन कुटुंबाचे मिलन जे दोन लोकांशी कायमचे एकमेकांशी जोडलेले असतात. होय, म्हणूनच भारतीय संस्कृतीत लग्नाला खूप महत्त्व आहे.   आज आम्ही तुम्हाला लग्नाशी संबंधित अशाच एका रोचक प्रथेची माहिती देणार आहोत.

  जे वाचल्यावर तुम्हीही म्हणाल की ही कसली एक विचित्र परंपरा आहे. भारतात  अनेक प्रकारच्या परंपरा प्रचलित आहेत. यापैकी एक खेळ पश्चिम गोदावरी जिल्ह्यात खेळला जातो. जो खूप विचित्र आहे. पश्चिम गोदावरी जिल्ह्याची ही परंपरा काकतीय शासकांच्या काळापासून येथे होत आहे.

  लग्नामध्ये सर्वांसमोर वधूला वराचे कपडे घालावे लागतात आणि वराला मुलीचा वेष लावून साडी किंवा लेहेंगा परिधान करावा लागतो. ही परंपरा विचित्र असू शकते पण गन्नमनीचे लोक पूर्ण उत्साहाने याचे पालन करत आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, या प्रथेद्वारे मुला-मुलीचा भेदभाव मोडून काढण्याचा प्रयत्न केला जातो.

  लग्नात मुलगा वधूचे कपडे घालतोच पण मुलीप्रमाणे सजून धजून देखील येतो. यासाठी त्याला दागिन्यांसह  इतर गोष्टीही घालाव्या लागतात. त्याच प्रकारे वधू देखील पॅन्ट-शर्ट किंवा धोती-कुर्ता घालून समारंभाला उपस्थित राहते.

  वेशभूषा देखील ती वाराप्रमाणेच करते. यासोबतच मुलांसारखा चष्मा घालण्याचा ट्रेंडही आहे.  ही परंपरा काकतीय राज्याची राणी रुद्रमा देवीच्या काळात सुरू झाली. असे म्हटले जाते की, त्यांचा सेनापती गन्नमनी कुटुंबातील होता. राणीने १२६३ ते १२८९ पर्यंत साम्राज्याची सत्ता सांभाळली आणि, या परंपरेमागील हेतू पुरुषांची प्रतिमा अधिक चांगल्या प्रकारे जगासमोर मांडायची होती.

  जेव्हा युद्धाच्या वेळी शेकडो सैनिकांना प्राण गमवावे लागले, तेव्हा स्त्रियांनी पुरुषांचे कपडे परिधान करून सैन्यात लढायचे ठरले. यानंतर हे पाऊल कामी आले आणि काकतीय राज्याला याचा अनेक युद्धांमध्ये फायदाही झाला. यासोबतच, कपड्यांची अदलाबदल करण्याची ही परंपरा गन्नमनी कुटुंबांच्या लग्नातही सुरू झाली, जी आजपर्यंत पाळली जात आहे.