तुमचे घर वास्तुशास्त्रानुसार आहे का? असे तपासा

एखादे घर हे वतुशास्त्राच्या नियमात बसते किंवा नाही हे जर तुम्हाला ओळखायचे असेल तर त्याचे काही नियम...

  नवीन घर बांधणे किंवा खरेदी करणे हा एक पुण्यकारक योग असतो, म्हणजे त्यासाठी पुण्य आणि पैसे दोन्हीही खर्च करावे लागतात. त्यामुळे ते घर किंवा वस्तू हे वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असणे फार महत्वाचे आहे. तसेच एखादे घर हे वतुशास्त्राच्या नियमात बसते किंवा नाही हे जर तुम्हाला ओळखायचे असेल तर त्याचे काही नियम आपण जाणून घेऊया.

  १. आपल्या पत्रिकेनुसार शुभ दिशा. जर आपल्या घरात सकाळ – संध्याकाळ पूजाअर्चा होत असेल तर घराची दिशा कुठलीही असली तरी हरकत नाही, अगदी दक्षिण दिशासुद्धा लाभ देते.

  २. घराचा ईशान्य कोण (दक्षिण-पश्चिम) हा देवघर, पाणीसाठा, प्रवेशद्वार यासाठी उपयुक्त असतो. यापैकी काहीच जर शक्य नसेल तर ईशान्य दिशा मोकळी ठेवावी परंतु त्याजागी संडास-मोरी कधीच नसावी.

  ३. स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असावे.

  ४. घरमालकाची झोपण्याची खोली शक्यतो नैऋत्य दिशेला असावी.

  ५. वायव्य दिशेला पाहुण्यांची खोली, सेकण्ड बेडरूम असावी

  ६. उत्तर दिशेला तिजोरी, मौल्यवान सामानाची जागा असावी

  ७. दक्षिणेस जिना, जड वस्तू, अडगळीच्या सामान, इलेक्ट्रिक मीटर असावे

  ८. संडास बाथरूम दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असावे.

  ९. प्रवेशद्वार पूर्व दिशेला असणे चांगले.

  १०. सरतेशेवटी, कष्टाने उभ्या केलेल्या घरात अभद्र, शापवाणी इ. उच्चार करू नये. वास्तुदेवता सतत ‘तथास्तु’ म्हणत असते.