gokulashtami

यावर्षी श्री कृष्णाची ५२४७ वी जयंती(Shreekrishna Jayanti) साजरी केली जात आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला गोकुळाष्टमी उत्सव साजरा केला जातो.

    आज गोकुळाष्टमी(Gokulashtami 2021) आहे. यावर्षी श्री कृष्णाची ५२४७ वी जयंती(Shreekrishna Jayanti) साजरी केली जात आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला गोकुळाष्टमी उत्सव साजरा केला जातो. या सणाच्या दिवशी घरे आणि मंदिरे सजवली जातात. जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाची भक्ती केली जाते. रात्री बारा वाजेपर्यंत मंदिरांमध्ये श्रीकृष्णाची गाणी म्हटली जातात. गोकुळाष्टमीचा शुभ मुहूर्त आणि पुजेबद्दल आज आपण जाणूून घेऊयात.

    मुहूर्त आणि खास योग – यावेळी गोकुळाष्टमीच्या दिवशी तोच योग आहे जो द्वापार युगात श्री कृष्णाच्या जन्माच्या दिवशी होता. यावेळी गोकुळाष्टमीच्या दिवशी अनेक शुभ योगायोग होत आहेत. गोकुळाष्टमीला यावेळी रोहिणी नक्षत्र आहे. तसेच अष्टमी तिथीला चंद्र वृषभ राशीत असणार आहे. आज गोकुळाष्टमीचा सण साजरा होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी २९ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ११.२५ वाजता सुरु झाली जी ३० ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत राहील. गोकुळाष्टमीच्या पूजेसाठी शुभ वेळ सकाळी ११.५९ ते दुपारी १२.४४ पर्यंत असेल.

    गोकुळाष्टमीची पूजा कशी कराल ?
    गोकुळाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे आणि आंघोळ करुन स्वच्छ कपडे घालावे. उपवास आणि पूजा करण्याचा संकल्प करावा. या दिवशी कृष्णभक्त उपवास ठेवतात आणि रात्री १२ वाजता कृष्ण जन्म साजरा करतात.गोकुळाष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाची बालस्वरुपाची पूजा केली जाते.रात्री पंचामृताने श्रीकृष्णाच्या मुर्तीवर अभिषेक करा आणि नंतर त्यांना नवीन कपडे, मोराचा मुकुट, बासरी, चंदन, वैजयंती माळ, तुळस, फळे, फुले, सुका मेवा, धूप, दिवा, अत्तर इत्यादी श्रीकृष्णाला अर्पण करा.मग कृष्णाचा पाळणा हलवा.  नैवेद्य अर्पण करा आणि आरती केल्यानंतर प्रसाद वाटप करा.

    जन्माष्टमीच्या दिवशी उपवास केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. मान्यता आहे की, हे व्रत केल्याने तुमची इच्छा लवकरच पूर्ण होते.