dahihandi

दरवर्षी जन्माष्टमीचे(Janmashtmi Special Article व्रत २ दिवस केले जाते.काहीजण पहिल्या दिवशी उपास करतात तर काहीजण दुसऱ्या दिवशी उपास करतात. मात्र यावेळी सर्वच जण एकाच दिवशी म्हणजेच ३० ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचे व्रत करतील.

  श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला.देशभरात जन्माष्टमी(Janmashtami 2021) उत्साहात साजरी केली जाते. यावेळी ३० ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया जन्माष्टमीचा मुहूर्त(Janmashtami Muhurt And Wrat) आणि व्रत याविषयी.

  दरवर्षी जन्माष्टमीचे व्रत २ दिवस केले जाते.काहीजण पहिल्या दिवशी उपास करतात तर काहीजण दुसऱ्या दिवशी उपास करतात. मात्र यावेळी सर्वच जण एकाच दिवशी म्हणजेच ३० ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचे व्रत करतील. यावेळी ३० ऑगस्टला रात्री २ वाजल्यानंतर नवमी आयोजित केली जाईल. म्हणून, यावेळी सर्व समाजातील लोकांनी ३० ऑगस्ट रोजी उपवास करणे योग्य ठरेल. त्याच दिवशी गोकुळाष्टमी आणि नंदोत्सवही साजरा केला जाईल.

  मुहूर्त – श्रीकृष्ण जन्माष्टमीला पूजनाचा शुभ मुहूर्त ३० ऑगस्टला रात्री ११ वाजून ५९ मिनिटे ते १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत राहिल.
  श्रावण वद्य अष्टमी प्रारंभ – २९ ऑगस्ट २०२१ रोजी रात्रौ ११ वाजून २५ मिनिटे
  श्रावण वद्य अष्टमी समाप्ती – ३० ऑगस्ट २०२१ मध्यरात्री २ वाजून १ मिनिटे

  व्रत कसे करावे ?
  जन्माष्टमीला मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करावा. बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. यानंतर श्रीकृष्णाची पूजा करावी.  श्रीकृष्णाची आरती आणि पूजा करून पुरुषसूक्त, विष्णूसूक्ताचे स्तवन करावे. चांगल्या कथा ऐकत रात्री जागरण करावे. गोकुळातील कृष्णजन्माच्या लीला श्रवण करावे. यावेळी पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून नैवेद्य दाखवावा. जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी. या दिवशी  उत्तरपूजा करावी. बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा. याच दिवशी काला करावा. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी आदी घालून केलेला एक खाद्यपदार्थ म्हणजे काला. काला हा कृष्णाचा आवडता पदार्थ. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत, असे मानले जाते. या दिवशी महाराष्ट्रात गोपाळकाल्याच्या निमीत्ताने दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.प्रत्येक राज्यामध्ये गोकुळाष्टमी आणि दहिहंडीचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात.