पर्समध्ये ठेवा ‘या’ वस्तू; पैशांची राहील बरकत

असे अनेकदा होते की पाकिटात पैसा टिकत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार जर काही उपाय केल्यास तुमच्या पाकिटात सदैव पैसा टिकून राहील.

  अनेक लोक पर्समध्ये विविध अशा गोष्टी ठेवतात ज्यांचा काही फायदा नसतो. अशा गोष्टी पर्समध्ये ठेवल्याने नकारात्मक प्रभाव वाढतो. त्यामुळे जे कागद फायद्याचे नाहीत अशा वस्तू वेळीच पर्समधून काढून टाकाव्यात.

  असे अनेकदा होते की पाकिटात पैसा टिकत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार जर काही उपाय केल्यास तुमच्या पाकिटात सदैव पैसा टिकून राहील.

  हे आहेत उपाय

  खाण्याच्या वस्तू ठेवू नका – कोणत्याही प्रकारच्या खाण्याच्या वस्तू पाकिटात ठेवू नका. काहींना गुटख्याची पाकिटे वगैरे पाकिटात ठेवण्याची सवय असते. यामुळे पाकिटात पैसा टिकत नाही.

  धार्मिक वस्तू – पाकिटात नेहमी पवित्र आणि धार्मिक वस्तू ठेवा. तुम्ही रुद्राक्षही पर्समध्ये ठेवू शकता.

  लाल रंगाचा लिफाफा – जर तुम्ही लाल रंगाचा लिफाफा पर्समध्ये ठेवल्यास तुमच्या पाकिटात पैशाची चणचण भासणार नाही.

  लक्ष्मीयंत्र – श्रीयंत्र प्रमाणेच लक्ष्मी यंत्र अथवा महालक्ष्मी यंत्रचा शुभ परिणाम होतो असे मानले जाते. श्रीयंत्र नसल्यास लक्ष्मीयंत्र अथवा महालक्ष्मी यंत्र पाकिटात ठेवा. यामुळे पाकिटात पैशाची अडचण निर्माण होणार नाही.