घरात जास्त मुंग्या निघणे देते आयुष्यात घडणाऱ्या ‘या’ गोष्टीचे संकेत!

घरातील मुंग्या या कोणत्या दिशेकङून निघतात आणि त्यांची ती लांबच लांब रांग नेमकी कुठे बरं जाते. यावरून तुम्हांला तुमच्या भविष्यात काय घडणार आहे, हे...

    शास्त्रानुसार  मुंग्याचे आपल्या घरात असण्यामागे बरेचसे शुभ व अशुभ संकेत हे तुमच्या आयुष्याशी निगडित असतात. त्यामुळे या मुंग्यांकङे मुळीच दुर्लक्ष करू नये.

    घरातील मुंग्या या कोणत्या दिशेकङून निघतात आणि त्यांची ती लांबच लांब रांग नेमकी कुठे बरं जाते. यावरून तुम्हांला तुमच्या भविष्यात काय घडणार आहे, हे समजते. याशिवाय घरात निघणाऱ्या मुंग्या या नेमक्या कोणत्या रंगांच्या आहेत, यावरून देखील तुम्हांला भविष्यात होणाऱ्या  घटनांबद्दल माहित होते. जाणून घेऊया या रहस्याबद्दल.

    लाल मुंग्यांचे संकेत : घरातील कोणत्याही कोपऱ्यात लाल रंगांच्या मुंग्या निघाल्या, तर तुम्ही आवर्जून सावधान व्हा. कारण लाल रंगांच्या मुंग्यांना खूपच अशुभ मानले जाते. लाल रंगाच्या मुंग्या निघण्याचा अर्थ म्हणजे तुमच्यासोबत काहीतरी वाईट गोष्ट घङणार आहे. कारण शास्त्रात सांगितल्याप्रमाणे लाल रंगांच्या मुंग्यांसोबत आर्थिक संकटे जुळलेली असतात.

    लाल रंगाच्या मुंग्यांच्या निघण्यामागे संकेत असा आहे की, येणाऱ्या भविष्यकाळात तुम्हांला धनप्राप्ती संबंधी संकटे निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमचे खर्च हे अचानकपणे वाढण्याचीही गडद शक्यता दिसून येते. परंतु लाल रंगांच्या मुंग्यांच्या तोंडात अंडी असतील तर तुमच्या जीवनात अचानकपणे धनप्राप्ती होणार असल्याचे देखील शुभ संकेत आहेत.

    काळ्या मुंग्यांचे संकेत : तुमच्या घरात काळ्या रंगाच्या मुंग्या येत असतील, तर तुम्ही आनंदी होऊ शकता. कारणही अगदी तसेच आहे. काळ्या रंगाच्या मुंग्या या अतिशय शुभ मानल्या जातात, म्हणून तर त्यांना देवाच्या मुंग्या असे म्हणतात. या रंगांच्या मुंग्यांमुळे सुख आणि ऐश्वर्य प्राप्ती होते.

    काळ्या रंगाच्या मुंग्या घराच्या उत्तर दिशेकङून येत असतील तर तुम्ही समजू शकता की, तुम्हांला काही खास शुभ्र वार्ता ऐकायला मिळणार आहेत. परंतु पूर्व दिशेकङून येणाऱ्या मुंग्या असतील, तर तुम्हांला धन प्राप्तीचा लाभ होण्याचा शुभ संकेत आहे.

    (टीप- वरील माहिती आध्यात्मिक दृष्टिकोनातून देण्यात आलेली आहे. अंधश्रद्धा पसरविण्याचा कोणताही हेतू नाही.)