Man's ancestor is considered to be a himmanav; Mentioned in many texts like Bharatiya Purana, Ramayana, Mahabharata

भारतीय लष्कराच्या पर्वतारोही अभियान दलातील जवानांनी हिमालयात हिममानवाची पाउले दिसल्याचे फोटो नुकतेच प्रसिद्ध केले आणि पुन्हा एकदा हा माणसाचा पूर्वज चर्चेत आला आहे. हिममानव किंवा यतीवर अनेक संशोधकांनी शोध घेतला आहे आणि अनेकांनी त्याचे फोटो प्रसिध्द केले आहेत मात्र त्याचा अस्तित्वाचे ठोस पुरावे कुणीही देऊ शकलेला नाही.

    पृथ्वीवर हिममानवाचे अस्तित्व खरोखर आहे का नाही याबाबत नेहमीच वाद आणि चर्चा होत असतात. मात्र भारतीय पुराणे, रामायण, महाभारत अश्या अनेक ग्रंथामध्ये हिममानव किंवा ज्याला यती म्हटले जाते त्याचे अनेक उल्लेख आढळतात. हनुमानासाठी जती असा शब्द वापरला जातो तो यतीचा अपभ्रंश आहे. म्हणजे हनुमान हा यतीचेच रूप आहे असे मानले जाते व त्यामुळे हिममानव हा माणसाचा पूर्वज मानला जातो.

    भारतीय लष्कराच्या पर्वतारोही अभियान दलातील जवानांनी हिमालयात हिममानवाची पाउले दिसल्याचे फोटो नुकतेच प्रसिद्ध केले आणि पुन्हा एकदा हा माणसाचा पूर्वज चर्चेत आला आहे. हिममानव किंवा यतीवर अनेक संशोधकांनी शोध घेतला आहे आणि अनेकांनी त्याचे फोटो प्रसिध्द केले आहेत मात्र त्याचा अस्तित्वाचे ठोस पुरावे कुणीही देऊ शकलेला नाही.

    कारण काही संशोधकांच्या मते ते तपकिरी रंगाचे महाप्रचंड अस्वल होते आणि ही प्रजाती हिमालयात आढळते. या प्रजाती वास्तविक ध्रुवीय प्रदेशात होत्या आणि 40 हजार ते 1 लाख 20 हजार वर्षापासून त्यांचे अस्तित्व आहे. अन्य वैज्ञानिकांच्या मते ते वानरासारखे आहेत आणि माणसासारखे ताठ उभे चालतात. सर्वप्रथम यती पहिल्याची नोंद 1925 साली केली गेली होती. एका जर्मन फोटोग्राफरने या हिममानवाचे फोटो काढले होते. त्यानंतर 1953 मध्ये एव्हरेस्ट सर करणारे सर एडमंड हिलरी आणि तेनजिंग नोर्गे यांनी एव्हरेस्टवर हिममानवाच्या पायाचे ठसे पहिल्याचा दावा केला होता मात्र नंतर हिलरी यांनी तो दावा मागे घेतला होता.

    हे सुद्धा वाचा