लक्ष्मीच्या कृपेने पैसा होईल आकर्षित!;शुक्रवारी गुपचूप करा ‘हा’ एक साधा उपाय

  आपल्याला सुख शांती वैभव धनसंपत्ती  मिळावी असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्नसुद्धा करत असतात. नुसते प्रयत्नकरून सुद्धा काही होत नाही त्याच बरोबर फक्त राबराब राबून सुद्धा काही होत नाही. फक्त कष्ट करून जर श्रीमंत होता आले असते तर जगामध्ये दगड फोडणारा हा व्यक्ती सुद्धा श्रीमंत झाला असता.

  ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले असते. मेहनत तर करावे परंतु त्याबरोबरच काही उपाय करावेत त्यामुळे आपल्याला आपल्या कार्यात भाग्याची साथ मिळेल व देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होईल. आपल्या धन संपत्तीत वाढ होईल. उत्पन्न वाढेल, अन्नधान्यात बरकत येईल. त्यासाठी आपण शुक्रवारी करण्याचा गुळाचा उपाय पाहणार आहोत.

  शुक्रवारचा दिवस लक्ष्मीचा दिवस मानला जातो. या दिवशी तुम्ही जर आपण धन-संपत्ती सन्मान आणि यशाची इच्छा बाळगली असेल आणि आयुष्यातील चढ-उतार आपल्याला दूर करायचे असेल तर शुक्रवारी प्राचीन काळापासून ज्योतिषांनी सांगितलेला हा उपाय करून बघा. लहान गुळाचा हा उपाय आहे त्यामुळे आपल्यावर लक्ष्मी देवी प्रसन्न होईल. हा उपाय केल्याने आपल्या घरावर लक्ष्मीची कृपा होईल आणि आयुष्य सुखमय होऊन जाईल.

  या उपायांचा कोणताही वैज्ञानिक आधार नाही मात्र तरीही प्राचीन काळापासून या लोकांचा विश्वास अबाधित आहे. आपण प्रत्येक शुक्रवारी देवळात जाऊन देवी लक्ष्मीची पूजा करत असाल आणि गूळ म्हणून प्रसाद अर्पण करत असाल तर आपले काम अजूनही सोपे होईल. आपल्या घरात जर पैसा नसेल तर हा उपाय केल्यास आपले नशीब बदलण्यास मदत करते त्यासाठी आपल्याला एक काम करावे लागणार असे केल्याने तुमच्या जीवनात आनंद कायम राहतो आणि जीवन संपन्न राहते.

  आपल्याला जर भीती वाटत असेल तर तांब्याच्या भांड्यात गूळ ठेवून त्यानंतर मंदिरात बसून उपासना करावी आणि स्तोत्र म्हणावे असे केल्याने अपघात भीतीचा त्रास दूर होऊ शकतो. जर तुमचा सूर्य ग्रह कमजोर असेल तर गुळ खावून पाणी प्या असे केल्याने त्यामुळे आपला सूर्य ग्रह मजबूत होतो.

  शुक्रवारच्या दिवशी गुळ दान केल्याने आपले पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. व आपले जीवन वैभवशाली होते यामुळे शुक्रवारी उपवास करावा. या दिवशी एक दक्षिणमुखी शंख पाण्याने भरून विष्णू देवा ला जल अभिषेक करावा असे सलग तीन शुक्रवारी केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. देवी लक्ष्मीची कृपा झाल्यास घरात सुख संपत्ती वैभव आणि भरभराट येते.

  (धार्मिक दृष्टीकोनातून ही माहिती देण्यात आलेली आहे. अंधश्रद्धा पसरविण्याचा कोणताही हेतू नाही)