muharram

मोहरममध्ये पैगंबर हजरत मुहम्मद यांचा नातू हजरत इमाम हुसेन (Hazrat Imam Hussain) यांच्यासह कर्बलाच्या लढाईत शहीद झालेल्या ७२ शहीदांची शहादत आठवून शोक व्यक्त केला जातो.

    मोहरमला (Muharram 2021) इस्लाम धर्मामध्ये दुःखाचा महिना मानले जाते. मुस्लिम समाज खासकरून शिया समुदायाचे लोक या महिन्याच्या नवव्या किंवा दहाव्या दिवशी रोजा ठेवतात. मोहरममध्ये पैगंबर हजरत मुहम्मद यांचा नातू हजरत इमाम हुसेन (Hazrat Imam Hussain) यांच्यासह कर्बलाच्या लढाईत(Battle Of Karbala) शहीद झालेल्या ७२ शहीदांची शहादत आठवून शोक व्यक्त केला जातो. या वर्षी मोहरम १९ ऑगस्टला आहे. या दिवशी ताजिया मिरवणूक काढली जाते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये मोहरमच्या दिवशी निर्बंध लागू आहेत.

    मोहरमचा इतिहास
    कर्बलाची लढाई सम्राट यजीद आणि हजरत इमाम हुसेन यांच्या सैन्यात झाली होती. इस्लामचे रक्षण करण्यासाठी इमाम हुसेन (Hazrat Imam Hussain) यांनी आपल्या कुटुंबासह आणि मित्रांसह सर्वोच्च बलिदान दिले. त्यांची शहादत मोहरमच्या दहाव्या दिवशी झाली होती. या दिवसाला आशुरा म्हणतात. दरवर्षी त्या शहिदांच्या स्मरणार्थ ताजिया बनवल्या जातात आणि जुलूस काढले जातात. ताजिया हे त्या शहिदांचे प्रतिक आहेत. शोक केल्यानंतर हे ताजिये कर्बलामध्ये दफन केले जातात.

    मोहरमच्या दिवशी शोक व्यक्त करताना ‘या हुसैन, हम न हुए।’ असे म्हणतात. त्याचे विशेष महत्त्व आहे. शोक व्यक्त करणारे लोक म्हणतात की ‘हजरत इमाम हुसेन, आम्ही खूप दुःखी आहोत’ कारण आम्ही कर्बलाच्या युद्धात (Battle of Karbala) तुमच्यासोबत नव्हतो. आम्ही देखील इस्लामचे रक्षण करण्यासाठी तुमच्यासोबत शहीद झालो असतो.