PHOTO : Navratri तील प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे Naivaidya आणि प्रसाद आणि त्यांचे महत्त्व

नवरात्रीच्या (Navratri) नऊ दिवसांमध्ये (9 days), जसे दुर्गा देवीच्या नऊ रूपांची वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते, त्याच प्रकारे, प्रत्येक दिवशी नैवेद्य किंवा प्रसाद (Naivaidya or Prasad) सुद्धा वेगळा तयार केला जातो.

  नवरात्रीमध्ये हे दुर्गा मातेला अर्पण करा, प्रत्येक इच्छा पूर्ण होईल

  नवरात्रीच्या (Navratri) नऊ दिवसांमध्ये (9 Days) भगवती देवीच्या (Devi Bhagwati) नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. यावेळी नवरात्री ७ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे, ती १४ ऑक्टोबर रोजी संपेल. नवरात्रीत भक्त देवी दुर्गाच्या उपासनेसह उपवास आणि उपासना करतात. तसे, तुम्ही आईला जे काही नैवेद्य प्रामाणिक अंतःकरणाने अर्पण करता ते आई स्वीकारते, परंतु नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये, जसे दुर्गा देवीच्या नऊ रूपांची वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते, त्याच प्रकारे, प्रत्येक दिवशी नैवेद्य किंवा प्रसाद सुद्धा वेगळा तयार केला जातो. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी देवीला कोणते नैवेद्य अर्पण करावे हे जाणून घेऊया…

  देवी शैलपुत्रीचा नैवेद्य

  नवारात्रीच्या पहिल्याच दिवशी दुर्गा मातेची प्रथम रुपात देवी शैलपुत्री केली जाते. पर्वतांचा राजा हिमालय याची मुलगी शैलपुत्रीला गायीचा तुपाचा नैवेद्य दाखवितात. असे केल्याने सर्व व्याधी आणि रोग बरे होतात आणि देवीआईकडून उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे शरीर निरोगी राहते.

  देवी ब्रह्मचारिणीचा नैवेद्य

  देवी भगवतीचे दुसरे रूप देवी ब्रह्मचारिणीची पूजा नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी केली जाते. देवी ब्रह्मचारिणी या जगाच्या सर्व परिवर्तनांची आणि अविनाशी जगाची दुष्टता जाणणारी आहे. या दिवशी देवीला साखर अर्पण करणे शुभ मानले जाते. हा नैवेद्य दाखविल्याने कुटुंबात सुख आणि शांती राहते आणि दीर्घायुष्याचे वरदान प्राप्त होते.

  देवी चंद्रघंटेचा नैवेद्य

  नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी, भगवती देवीचे तिसरे रूप चंद्रघंटाची पूजा केली जाते. त्याच्या डोक्यावर घंटेच्या आकाराची चंद्रकोर आहे. या दिवशी आईला दूध किंवा दुधापासून बनवलेला नैवेद्य अर्पण करावा. तसेच, अर्पण केल्यानंतर ते दान म्हणूनही द्यावा. असे केल्याने मानसिक शांती तसेच परम आनंद प्राप्त होतो.

  देवी कूष्मांडाचा नैवेद्य

  नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी दुर्गेच्या चौथ्या रुपात कूष्मांडा देवीची पूजा केली जाते. या दिवशी देवीला मालपोह्यांचा नैवेद्य अर्पण करावा. सोबतच हा नैवेद्य मंदिर किंवा गरीब किंवा गरजू लोकांना दान करायला हवा. असे केल्याने आई उत्तम बुद्धी प्राप्त व्हावी असा आशीर्वाद देते आणि यामुळे निर्णय क्षमतेत वाढ होते.

  देवी स्कंदमातेचा नैवेद्य

  नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी भगवतीच्या पाचव्या रुपात स्कंदमातेची विधीपत पूजा केली जाते. ब्रह्मस्वरूप सनत्कुमारची आई असल्या कारणाने तिला स्कंदमाता असे म्हणतात. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी केळीचा नैवेद्य दाखविणे अतिशय शुभ मानले जाते. असे केल्याने करिअरमध्ये प्रगती होते आणि परिवारातील सदस्य आपापल्या क्षेत्रात प्रगती करतात.

  देवी कात्यायनीचा नैवेद्य

  नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी भगवतीची सहाव्या रुपात देवी कात्यायनीची पूजा केली जाते. महर्षी कात्यायन यांच्याकडे मुलीच्या रुपात जन्म घेतल्याने तिचे नाव कात्यायनी पडले. सहाव्या दिवशी देवी दुर्गेच्या या रुपाला मधाचा नैवेद्य दाखविल्यास तो उत्तम फलदायी मानला जातो. असे केल्याने सौंदर्यप्राप्ती होते आणि देवी भगवतीही प्रसन्न होते.

  देवी कालरात्रीचा नैवेद्य

  नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी दुर्गेच्या सातव्या रुपात देवी कालरात्रीची पूजा करण्याची प्रथा आहे. देवी कालरात्री वर्ण आणि वेशात अर्धनारीश्वर शंकराच्या तांडव मुद्रेत दिसते. या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य अर्पण करावा आणि प्रसादाच्या रुपात तो प्रत्येकाला द्यावा. असे केल्याने शत्रूंपासून आपली सुटका होते आणि संकटात देवी आपलं रक्षणही करते.

  देवी महागौरीचा नैवेद्य

  नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी दुर्गेच्या अष्टम स्वरुपात महागैरीची पूजा केली जाते. या देवीने आपल्या तपर्श्चयेने गोरा वर्ण प्राप्त केला होता. नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीला नारळाचा नैवेद्य दाखवावा. सोबतच नारळाचे दान करणे हेही शुभपलदायी मानले गेले आहे. असे केल्याने देवी माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण करते.

  देवी सिद्धिदात्रीचा नैवेद्य

  नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवी दुर्गेच्या नवव्या रुपात देवी सिद्धिदात्रीची विधीवत पूजा करायला हवी. या दिवशी देवीला चणे-हलव्याचा नैवेद्य दाखविला जातो. सोबतच कन्या पूजनही करावे. असे केल्याने घरपरिवारात सुख-शांती कायम राहते आणि देवीच्या आशीर्वादाने समृद्धीही येते.