शनिवारी पिंपळाच्या वृक्षाखाली लावा दिवा; मिळतील अद्भुत फायदे

या नकारात्मक गोष्टी दरिद्रता देवी त्या व्यक्तीसोबत त्या व्यक्तीच्या घरी जाते आणि मग त्या व्यक्तीच्या घरात दुःख दरिद्रता कंगाली या सर्व नकारात्मक गोष्टी प्रवेश करतात...

  हिंदू धर्मात अनेक वृक्षांची पूजा केली जाते आणि त्यापैकी सर्वश्रेष्ठ वृक्ष आहे पिंपळ या पिंपळस अश्वत असंही म्हटलं जातं हिंदू धर्मशास्त्रानुसार या पिंपळाच्या वृक्षाची सर्व देवी देवतांचा वास असतो आणि म्हणूनच जी व्यक्ती मनोभावे या पिंपळाच्या वृक्षाखाली एक दिवा प्रज्वलित करते आणि त्यायोगे या पिंपळाच्या वृक्षाची पूजा करते त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या कष्ट संकटे दूर होतात धन समृद्धी यश कीर्ती इत्यादींची त्या व्यक्तीस प्राप्ती होते ज्यांना शक्य आहे त्यांनी दररोज प्रति दिन या पिंपळाच्या वृक्षाखाली एक दिवस नक्की प्रज्वलित करावा.

  जर ते शक्य नसेल तर कमीत कमी शनिवारच्या दिवशी आपण पिंपळाच्या वृक्षाचे पूजन नक्की करा अशी मान्यता आहे की पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्याने या संपूर्ण ब्रम्हांडाची पालक श्रीहरी विष्णू तर प्रसन्न होतातच मात्र सोबतच माता लक्ष्मीची कृपा आशीर्वादाने प्रचंड पैसा वैभव संपत्ती आपल्या जीवनात नक्की निर्माण होते आपले पूर्वज आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या पितरांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील मोठ्यात मोठ्या समस्या दोष नक्की दूर होतात.

  सोबतच जर तुमच्या मनामध्ये एखादी मनोकामना असेल इच्छा असेल त्या इच्छेची पूर्ती करण्यासाठीसुद्धा आपण दररोज किंवा कमीत कमी शनिवारच्या दिवशी या पिंपळाचं पूजन म्हणजेच या पिंपळाच्या वृक्षाखाली एक दिवा नक्की प्रज्वलित करा मित्रांनो हा जो दिवा प्रज्वलित करायचा आहे पण तिचे नियम कोणते आहेत दिवसातील कोणत्याही वेळी हा दिवा आपण प्रज्वलित करायला हवा  पिंपळाच्या वृक्षाबाबत एक अत्यंत महत्त्वाची माहिती रविवारच्या दिवशी चुकूनही आपण पिंपळाच्या वृक्षाची पूजा करू नका.

  किंवा या वृक्षाखाली बसन टाळा खर तर आपण जर एखादा उपाय करणार करणार असेल तर तो पण रविवारच्या दिवशी करू शकता मात्र त्या रविवारी विशिष्ट तिथी असायला हवी उदाहरणार्थ जर पौर्णिमा असेल अमावस्या असेल किंवा एखादी विशिष्ट तिथी जर त्या दिवशी असेल तर तिथी समोर वार फिके पडतात म्हणून तिथे समोर वारांच महत्त्वाची वार तितकासा महत्त्वाचा नसतो मात्र कोणत्याही प्रकारची विशिष्ट स्थिती असेल तर त्यावेळी मात्र आपण रविवारच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली बसनेसुद्धा टाळा

  या पाठीमागचे कारण हिंदू धर्मशास्त्रात अस सांगितले आहे माता लक्ष्मीची ज्येष्ठ बहिण म्हणजेच मोठी बहीण अलक्ष्मी दरिद्रता देवी मित्रांनो या दरिद्रता देवीचा वास रविवारच्या दिवशी या पिंपळाच्या वृक्षाखाली मांडण्यात आलेला आहे रविवारच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली दरिद्रता देवी नृत्य करते असा हिंदू धर्मशास्त्र वर्जित करत आणि म्हणूनच जी व्यक्ती या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली येते कोणत्याही विशिष्ट तिथींन शिवाय या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली ही व्यक्ती पूजा करते किंवा जल अर्पित करते किंवा या पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालते त्या व्यक्तीसोबत दरिद्रता देवी ही कंगाली गरिबी दुःख या सर्व काही नकारात्मक गोष्टी आहेत.

  या नकारात्मक गोष्टी दरिद्रता देवी त्या व्यक्तीसोबत त्या व्यक्तीच्या घरी जाते आणि मग त्या व्यक्तीच्या घरात दुःख दरिद्रता कंगाली या सर्व नकारात्मक गोष्टी प्रवेश करतात अनेक उपाय करूनसुद्धा अनेक टोटके करून सुद्धा ही दरिद्रता घर सोडण्याच नाव घेत नाही आणि ज्या ठिकाणी दरिद्रता असेल त्याठिकाणी लक्ष्मीचा वास कधीच नसतो. आपण दररोज हा उपाय करू शकता रविवार वगळून प्रत्येक शनिवारी केला तरी लाभ मिळतो.

  (वरील माहिती धार्मिक मान्यतेनुसार देण्यात आलेली आहे. याचा अंधश्रध्येही संबंध नाही)