raksha bandhan

श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या(Shravan Pournima) तिथीला रक्षाबंधन साजरे केले जाते. त्यामुळे श्रावणातील पौर्णिमेला राखीपौर्णिमा असेही म्हणतात. यावेळी रक्षाबंधनाचा सण २२ ऑगस्ट २०२१ रोजी साजरा केला जाईल. यावर्षीचा रक्षाबंधनासाठीचा मुहूर्त(Raksha Bandhan Muhurt) आपण जाणून घेऊयात.

  रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan 2021) सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा सण प्रत्येक भाऊ आणि बहिणीसाठी खास असतो. या दिवशी बहीण तिच्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याच्या हातावर राखी(Rakhi) बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो.श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या(Shravan Pournima) तिथीला रक्षाबंधन साजरे केले जाते. त्यामुळे श्रावणातील पौर्णिमेला राखीपौर्णिमा असेही म्हणतात. यावेळी रक्षाबंधनाचा सण २२ ऑगस्ट २०२१ रोजी साजरा केला जाईल. यावर्षीचा रक्षाबंधनासाठीचा मुहूर्त(Raksha Bandhan Muhurt) आपण जाणून घेऊयात.

  रक्षाबंधनाचा मुहूर्त

  •  पौर्णिमा तिथी –२१ ऑगस्ट २०२१ रोजी संध्याकाळी ७ वाजल्यापासून ते २२ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजून ३१ मिनिटांपर्यंत.
  • पूजेचा शुभ मुहूर्त – सकाळी ६ वाजून १५ मिनिटांपासून ते संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटांपर्यंत
  • राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त – दुपारी १ वाजून ४२ मिनिटांपासून ते संध्याकाळी ४ वाजून १८ मिनिटांपर्यंत राहील

  रक्षाबंधनाची तयारी –  कुमकुम, अक्षता, दिवा, मिठाई आणि राखी एका ताटामध्ये ठेवा. भावाला टिळा लावा आणि त्याच्या हातावर राखी बांधा. भावाचे औक्षण करुन त्याला मिठाई खायला द्या. या दिवशी भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो.

  raksha mantra

  रक्षा मंत्र

  येन बुद्धो बलि: राजा दानवेंद्रो महाबल|
  तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल||

  रक्षा मंत्राचा अर्थ –  मी तुला त्याच संरक्षण सूत्रात बांधते ज्यामध्ये महान राजा बलिला बांधण्यात आले होते. हे राखी, तू ठाम राहा. रक्षणाच्या संकल्पाने कधीही विचलित होऊ नको. या इच्छेसह बहीण तिच्या भावाच्या मनगटावर राखी बांधते.

  रक्षाबंधनाची कथा – राजा बलिच्या सांगण्यावरुन विष्णू पाताळात गेले होते. तेव्हा श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला त्याने संरक्षक धागा बांधून विष्णूला मागितले होते. अन्य एका आख्यायिकेनुसार, राजसूयच्या यज्ञात द्रौपदीने राखीऐवजी तिच्या पदराचा तुकडा भगवान श्रीकृष्णाला बांधला होता. तेव्हापासून राखी बांधण्याची परंपरा सुरु झाली.