तुळशीखाली उगवलेले रोप लगेच काढा; जाणून घ्या त्यामागचे कारण

तुळशी जवळची जागा अस्वच्छ असणे आपण अशुभ मानतो, कारण तुळशीचे पावित्र्याची आभा अवतीभवती पसरलेली असते. तुळशीच्या पिंपळाच्या लिंबाच्या झाडाभोवती कचरा केल्यास त्याचे नकारात्मक परिणाम होतात.

  जुने लोकं म्हणतात की, तुळशीच्या अवतीभवती कचरा करू नये. तुळशीचे वृंदावन नेहमी स्वच्छ असावे.

  तुळशी जवळची जागा अस्वच्छ असणे आपण अशुभ मानतो, कारण तुळशीचे पावित्र्याची आभा अवतीभवती पसरलेली असते. तुळशीच्या पिंपळाच्या लिंबाच्या झाडाभोवती कचरा केल्यास त्याचे नकारात्मक परिणाम होतात.

  ज्यावेळी आपण तुळशीला जल अर्पण करतो दिवा लावतो अगरबत्ती लावतो तेथील वातावरण दैवी शक्तीने परिपूर्ण झालेले असते.  आपण आपल्या अवतीभवती सकारात्मक ऊर्जेचे अस्तित्व अनुभवतो.

  आपल्या सर्व इच्छा, अपेक्षा पूर्ण व्हाव्यात अशी आपली सकारात्मक इच्छाशक्ती बोलू लागते. देवापर्यंत आपले म्हणणे पोहोचते व आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

  आपल्या तुळशीच्या वृंदावनाच्या आजूबाजूला गवताचे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे गवत आल्यास ते आपल्या इच्छा आहेत व त्या इच्छा आपल्या पूर्ण होणार आहेत असे समजावे.

  तुळशीजवळ त्या रोपाला हात जोडून विनंती करावी की तुम्ही माझ्यासोबत आमच्या घरात या. आमचे कल्याण करा आमच्या सर्व अडचणी दूर करून आम्हाला सुखी-समाधानी ठेवा.

  असे म्हणून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते रोप मुळासकट घेऊन त्याला पाण्याने स्वच्छ धुवावे देवघरामध्ये किंवा पूजेच्या ठिकाणी त्याला ठेवावे.

  त्याला हळदी कुंकू लावून त्याची मनोभावे पूजा करावी आपल्या सर्व इच्छा त्याच्याजवळ बोलून दाखवाव्यात व हात जोडून मनापासून प्रार्थना करावी व तुपाचा दिवा तेथे लावा.

  मनोभावे पूजा करून झाल्यानंतर त्या रोपाला एका पिवळ्या वस्त्रांमध्ये गुंडाळून आपल्या पर्स मध्ये पाकीट मध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो तेथे ठेवून द्यावे. त्यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होणार आहेत.

  आपल्याला जर शत्रूंचा त्रास होत असेल तर घराच्या चौकटीला हे रोप आपण बांधू शकतो. चौकटीला बांधण्या आधी पिवळ्या कापडामध्ये आपल्याला हे रोप बांधायचे आहे.

  जर आपल्याकडे पिवळे कापड नसेल तर पिवळ्या कागदामध्ये बांधायचा आहे आणि पिवळा कागद पण नसेल तर आपल्याला पांढरा कागद घेऊन त्याला हळदीने पिवळे करून घ्यावे व ते दरवाजावर बांधून ठेवावे.